Uncategorized

माढा लोकसभेचे पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी उद्योग मंत्री उदयजी सामंत यांची सदिच्छा भेट घेतली.


म्हसवड येथील केंद्र शासन व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात येणार्या बंगलोर-मुंबई इकॉनॉमीक कॉरिडॉर तथा नॅशनल इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्पामध्ये गारवड गावाचा समावेश करण्यासाठी पाठपुरावा व सकारात्मक चर्चा करण्यात आली.

बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, या म्हणीचा प्रत्यय पुन्हा एकदा पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभेच्या जनतेला कार्यातून दाखवून दिले…

मुंबई ( बारामती झटका )

माढा लोकसभेचे कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी दिलेला शब्द पाळून ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले’ या म्हणीचा प्रत्यय पुन्हा एकदा माढा लोकसभेच्या जनतेला कार्यातून दाखवून दिलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत यांची मुंबई मंत्रालय येथे सदिच्छा भेट घेऊन सकारात्मक चर्चा करून म्हसवड येथील केंद्र शासन व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात येणार्या बेंगलोर-मुंबई इकॉनोमिकल कॉरिडॉर तथा नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडोर प्रकल्पामध्ये माळशिरस तालुक्यातील गारवाड गावाचा समावेश करण्यासाठी पाठपुरावा व सकारात्मक चर्चा केलेली आहे.

माळशिरस तालुक्यातील गारवाड गावचा म्हसवड कॉरिडॉरमध्ये समावेश व्हावा, यासाठी माळशिरस तालुक्यातील विविध राजकीय सामाजिक संघटनेतील यंग ब्रिगेड ॲड. सोमनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येऊन लढा उभा केलेला होता. माळशिरस तहसील कार्यालय येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण कॉरिडॉर संघर्ष समिती व गारवाड ग्रामस्थ यांचे लाक्षणिक उपोषण सुरू होते. यावेळी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी भ्रमनध्वनी वरून संपर्क साधून कॉरिडोर संघर्ष समिती व ग्रामस्थांची मागणी कॉरिडॉरमध्ये गारवाड गावाचा समावेश करण्याची आहे. यावर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिल्ली येथे महाराष्ट्रात आल्यानंतर उद्योग मंत्री उदयजी सामंत यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सहकार्याने माळशिरस तालुक्यातील अनेक दिवसाची युवकांची व जनतेची असणारी मागणी पूर्ण करण्याकरता आपल्यासोबत असल्याचे सांगितलेले होते. त्याप्रमाणे ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले’ या उक्तीचा प्रत्यय माळशिरस तालुक्यातील जनतेला आलेला आहे.

कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उद्योग मंत्री उदयजी सामंत यांना दि. 18/04/2023 रोजी दिलेल्या पत्रामध्ये नमूद केलेले आहे. माझ्या माढा लोकसभा मतदार संघातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील म्हसवड येथे केंद्र शासन व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने बंगलोर-मुंबई इकॉनॉमीक कॉरिडॉर तथा नॅशनल इंडस्ट्रीयल कॉरिडॉर विकसित होत आहे. या कॉरिडॉर लगत असणाऱ्या गावांपैकी गारवाड हे एक गाव आहे. मात्र जरी हे गाव कॉरिडॉर लगत असले तरी सदरचे गाव सोलापूर जिल्ह्यात येत असल्याने या गावाचा समावेश अद्याप कॉरिडॉरमध्ये झालेला नाही.

माझ्या माढा लोकसभा मतदार संघातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठ सहज उपलब्ध होण्यासाठी व दुष्काळी भागाच्या औद्योगिक वाढीसाठी बंगळूर-मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये म्हसवड, धुळदेव सह गारवाडचा सामावेश व्हावा, अशी मागणी माळशिरस तालुक्यातील जनतेची आहे.

सातारा व सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील कायम दुर्लक्षित भागाच्या विकासासाठी हा इकॉनॉमिक कॉरिडॉर महत्त्वाचा असून, येथे औद्योगिक क्षेत्र विकसित झाल्यास या भागाचा कायापालट होणार आहे. सातारा जिल्ह्यातील म्हसवड व धुळदेव या गावांना लागून सोलापूर जिल्ह्यातील गारवाड हे गाव आहे. येथील जमीन मालकांनी महाराष्ट्र शासनाला औद्योगिक क्षेत्रास जमीन देण्यासंदर्भात ना हरकत दिली आहे. त्यामुळे औद्योगिक कॉरिडॉरसाठी सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील एकूण ८ हजार एकर जमीन उपलब्ध होईल. तसेच या परिसरातील साधारण ९६५ एकर जमीन पडीक असून ती शेतीसाठी उपयुक्त नाही.

हा प्रस्तावित म्हसवड येथील केंद्र शासन व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात येणार्या बंगलोर-मुंबई इकॉनॉमीक कॉरिडॉर तथा नॅशनल इंडस्ट्रीयल कॉरिडॉर पर्यायी पुणे-बंगळूर व पुणे-पंढरपूर या महामार्गालगत आहे. यामुळे हा प्रकल्प शेतकरी आणि औद्योगिक वाढीपासून दूर असलेल्या या भागातील लोकांसाठी उपयुक्त ठरेल. द्राक्ष, डाळिंब आणि इतर फळे तसेच भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या नाशवंत मालासाठी सुलभ बाजारपेठ आणि जलद वाहतूक मिळेल. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष घालून म्हसवड, धुळदेव सह गारवाडचा समावेश होऊन हा आगामी इकॉनॉमिक कॉरिडॉर तथा नॅशनल इंडस्ट्रीयल कॉरिडॉर विकसित करण्यात यावा, अशी माझी आपणांस विनंती आहे. असे पत्र दिलेले असल्याने माळशिरस तालुक्यात उद्योग व्यवसायाला चालना व युवकांच्या हाताला काम देणारे पहिले लोकप्रतिनिधी म्हणून माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या कामगिरीवर माळशिरस तालुक्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

  1. I thoroughly enjoyed this piece. It was both informative and engaging, providing a lot of valuable information. Let’s discuss further. Check out my profile for more interesting content.

Leave a Reply

Back to top button