माढेश्वरी अर्बन बँकेची रविवारी १३ ऑगस्ट रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा – व्हा. चेअरमन अशोक लुणावत
माढा (बारामती झटका)
माढा येथील माढेश्वरी अर्बन को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट बँकेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. १३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजता बँकेचे चेअरमन आमदार बबनराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली माढा येथे बँकेच्या मुख्य कार्यालयात संपन्न होणार असून या सभेला सर्व संचालक, सभासद, खातेदार, ठेवीदार व कर्जदार यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन बँकेचे व्हा. चेअरमन अशोक लुणावत यांनी केले आहे.
सध्या माढेश्वरी बँकेच्या माढा, टेंभुर्णी, पंढरपूर, लोणी काळभोर, करकंब, कुर्डूवाडी, सोलापूर व करमाळा येथे अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने व सर्व सभासदांच्या विश्वासास पात्र राहून ८ शाखा सुरू आहेत. सध्या बँकेचे १० हजारापेक्षा जास्त सभासद आहेत. बँकेला सातत्याने ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला असून बँकेने सर्वांच्या सहकार्याने २०० कोटी ठेवींचा टप्पा पार केलेला आहे.
बँकेच्यावतीने आर्थिक व्यवहाराबरोबरच विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना, मोफत नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, पंढरपूर येथे आषाढी एकादशीला जाणाऱ्या ४०० वारकऱ्यांसाठी निवासाची, भोजनाची व चहापाण्याची व्यवस्था आदी सामाजिक उपक्रम दरवर्षी राबविले जातात, असेही त्यांनी सांगितले आहे.
बँकेच्या सर्व सभासद व खातेदारांनी आधारकार्ड, पॅन कार्ड, फोटो आणि मोबाईल नंबर देऊन केवायसीची (KYC) पूर्तता करून घ्यावी. ज्या सभासद व खातेदारांनी वारसाची नोंद केली नाही, त्यांनी नोंद करून घ्यावी असे आवाहन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुळे यांनी केले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng