Uncategorizedताज्या बातम्या

मारकडवाडी हद्दीतील गोरेवस्ती येथील हनुमान भक्तांचे श्रद्धास्थान असणारे वश्या मारुती भक्त मंडपाचे काम अंतिम टप्प्यात…

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या विशेष प्रयत्नातून मंदिर परिसर सुशोभित व विकसित होऊन पर्यटन स्थळ बनणार

सदाशिवनगर ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात मारकडवाडी ग्रामपंचायत हद्दीत तामसिदवाडी व सदाशिवनगर गावांच्या सीमेलगत असणारे स्वयंभू जागृत भाविक भक्तांना नवसाला पावणारा हनुमान आहे. त्याची ओळख वश्या मारुती म्हणून आहे. हनुमान भक्तांचे श्रद्धास्थान असणारे वश्या मारुती मंदिर परिसर भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या विशेष प्रयत्नातून सुशोभित व विकसित होऊन विकास कामांना गती मिळालेली आहे. पर्यटन स्थळ म्हणून पर्यटक व हनुमान भक्त यांचे श्रद्धास्थान बनणार आहे.

मारकडवाडी व तामसिदवाडी गावच्या सरहद्दीवर गोरेवस्ती येथे स्वयंभू जागृत मारुती मंदिराचे स्थान आहे‌. गोरे वस्ती व आसपासच्या भाविक भक्तांनी मंदिराचे भव्य शिखर व सभामंडप स्वखर्चाने लोकवर्गणीतून बांधले आहे. आकर्षक शिखर डिझाईन, मंडपाचे डेरेदार बांधकाम आणि मारुतीचे पावित्र्य या सर्व गोष्टी गोरे वस्ती येथील हनुमान भक्त मनापासून करत आहेत. या मंदिरात वर्षातून दोन-तीन वेळा मोठे उत्सव असतात. यामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे सुद्धा आयोजन केले जाते.

वश्या मारुती मंदिराच्या आसपास बाजूने ओढा व समोरच्या बाजूला गायरान सामाजिक वनीकरणाची जागा आहे. वश्या मारुती परिसर निसर्गरम्य ठिकाण आहे. सदरच्या जागेत माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते व सौ. संस्कृतीताई सातपुते यांनी 3333 वृक्षांची लागवड करून मंदिर परिसर सुशोभीकरण व विकसित करण्यास वृक्षारोपणाने सुरुवात केली. मंदिर परिसरात भाविकांना बसण्यासाठी कठडे बांधले आहेत. संरक्षक भिंत बांधलेली आहे‌. उजेडासाठी हायमास्ट दिवा आहे. भाविकांना मंदिराच्या समोर धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद घेण्यासाठी पेव्हर ब्लॉक बसवलेले आहेत.

दिवसेंदिवस भाविकांची वश्या मारुतीविषयी श्रद्धा वाढत आहे. शनिवारी व इतर वारी सुद्धा आसपासच्या गावातील लोक दर्शनासाठी येत असतात. निसर्गरम्य मंदिर परिसर असल्याने पर्यटन ठिकाणाची वाटचाल सुरू आहे. वश्या मारुती मंदिरास ‘ब’ वर्ग दर्जा देण्याचे काम सुरू आहे.

धार्मिक उपक्रम व पर्यटक यांच्यासाठी मंदिर परिसरात 40 बाय 100 असे भव्य सभामंडप उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. भक्त मंडपाच्या दोन्ही बाजूला वातानुकूलित भक्त निवास तयार करण्यात येणार आहे. लग्न समारंभ सुद्धा सदरच्या भव्य हॉलमध्ये होऊ शकतात. मारुतीचे धार्मिक विधी करण्यासाठी भाविकांना सुद्धा त्याचा उपयोग होणार आहे‌. निसर्गरम्य ठिकाण असल्याने मंदिर विकास परिसर करीत असताना मंदिराच्या पाठीमागे ओढ्यावर बंधारा आहे‌. सदर ठिकाणी बोटिंग सुरू करून घाट बांधण्यात येणार आहे. लहान मुलांना खेळणी तयार करून बालोद्यान केले जाणार आहेत. आसपासच्या भागातून मारुतीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना व पर्यटकांना पिण्याच्या पाण्यासाठी आरो फिल्टर उभारण्यात येणार आहे. दळणवळणाची सुविधा रस्ते तयार करण्याचे काम सुरू आहे. भविष्यामध्ये माळशिरस तालुक्यात पर्यटन स्थळांमध्ये वश्या मारुतीचे मंदिर होऊ शकते.

अशा पद्धतीने मंदिर सुशोभित व विकसित करण्याचे काम सुरू आहे. गोरे वस्ती वरील सर्व बागायतदार, शेतकरी, कामगार व मोलमजुरी करणारे यांनी सुद्धा आपापल्यापरीने मंदिर कळस व सभामंडप बांधण्यासाठी आर्थिक मदत केलेली आहे. सर्व धार्मिक उत्सवामध्ये सर्वांचा सहभाग असतो. गोरे वस्ती येथील हनुमान भक्तांच्या सहकार्यामुळे मंदिर उभा राहिलेले आहे. माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या विशेष प्रयत्नातून विकासकामांना गती मिळालेली आहे‌. हनुमान भक्त हरिभाऊ पालवे यांचा पाठपुरावा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या विशेष प्रयत्नातून व सहकार्यातून सुरू आहे. हनुमान भक्तांच्या मनामध्ये असणाऱ्या सर्व संकल्पना पूर्ण होतील, असा हनुमान भक्तांना आशावाद आहे. लवकरच वशा मारुती पर्यटकांचे व भाविकांचे श्रद्धास्थान ठरणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button