माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर आजपासून अचानक रजेवर ? तालुक्यात उलटसुलट चर्चा..
माळशिरस तहसील कार्यालयात ‘आंधळं दळतंय कुत्र पिठ खातंय’ अशा मथळ्याची बातमी बारामती झटका वेब पोर्टलवर प्रसिद्ध करून पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील लक्ष देऊन स्टिंग ऑपरेशन करतील का ? असा सवाल उपस्थित केला होता.
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर अचानक आज गुरुवार दि. १६ फेब्रुवारी २०२३ पासून रजेवर गेलेले असल्याने माळशिरस तालुक्यात उलट सुलट चर्चेला उधाण आलेले आहे. दि. १५ फेब्रुवारी २०२३ रोजी बारामती झटका वेब पोर्टलवर माळशिरस तहसील कार्यालयात ‘आंधळं दळतंय कुत्र पिठ खातंय’, अशी दयनीय अवस्था असून सर्वसामान्य जनता व शेतकरी वर्गातून नाराजीचा सूर निघत आहे. माळशिरस तालुक्यात प्रांताधिकारी नसून अडचण तर तहसीलदार असून खोळंबा अशी अवस्था झालेली आहे. माळशिरस तालुक्यातील दोन आमदार यांचे दुर्लक्ष पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील लक्ष वेधून स्टिंग ऑपरेशन करतील का अशा मथळ्याची बातमी प्रसारित केलेली होती.
बातमीच्या दुसऱ्याच दिवशी अचानक तहसीलदार दि. १६ तारखेपासून रजेवर गेलेले असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे.
विश्वासनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महसूल मंत्रालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला तक्रारीच्या अनुषंगाने सूचना करण्यात आल्या. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तहसीलदार जगदीश निंबाळकर यांना आजपासून रजेवर जाण्याच्या सूचना केल्याची गोपनीय माहिती आहे. तहसीलदार यांनी रजेचा अर्ज दिलेला असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे. दि. १६ ते २३ रजा असल्याची महसूल विभागात चर्चा सुरू आहे. दि. २३ तारखेनंतर हजर होतात का ? पुढे रजा वाढवून घेतात, यावर पुढील निर्णय अवलंबून राहणार आहे. अचानक रजेवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सूचना आहेत का आणखी काही, याचे नेमके कारण कोणते आहे, अद्याप स्पष्ट झालेले नाही. तालुक्यामध्ये बेकायदेशीर उत्खनन, तहसील कार्यालयातील तक्रारी किंवा अन्य असे कोणतेही कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, रजेवर गेलेत हे निश्चित आहे. अद्यापपर्यंत तहसीलदार यांचा पदभार कोणाकडे आहे याची माहिती उपलब्ध झालेली नाही.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Поиск в гугле