माळशिरसचे तहसीलदार तुषार देशमुख यांची फलटण प्रांत कार्यालयात बदली
माळशिरस (बारामती झटका)
तहसील कार्यालय माळशिरस येथे तहसीलदार पदावर कार्यरत असणारे श्री. तुषार देशमुख यांची फलटण प्रांत कार्यालय येथे बदली झालेली आहे.
माळशिरस तहसील कार्यालय येथे निवासी नायब तहसीलदार या पदावर तुषार देशमुख यांनी दि. 14 ऑगस्ट 2018 साली पदभार घेतलेला होता. त्यांनी नंदुरबार, जळगाव या ठिकाणी प्रशासनात सेवा केलेली आहे. माळशिरस तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार या पदावर गेली अनेक वर्ष कार्यरत असल्याने माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचा दैनंदिन संबंध येत होता. अनेक लोकांची अडचण तुषार देशमुख यांनी सोडवलेली होती. त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यात असल्याने पूर्ण वेळ माळशिरस तहसील कार्यालय येथे कार्यरत होते. तहसील कार्यालयांमध्ये पूर्ण काम संपल्याशिवाय कार्यालय सोडत नव्हते. रात्री दहा-दहा वाजेपर्यंत शाळेतील विद्यार्थ्यांचे दाखले, शेतकऱ्यांचे दाखले अशी कामे करीत होते. सुसंस्कृत स्वभाव व साधी राहणी असल्याने सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये तुषार देशमुख यांच्या विषयी आदराचे स्थान होते.
तहसीलदार जगदीश निंबाळकर रजेवर गेल्यानंतर तहसील कार्यालयाचा तहसीलदार पदाचा पदभार तुषार देशमुख यांच्याकडे दि. 16 फेब्रुवारी 2023 पासून होता. त्यांनी तहसीलदार पदाचा पदभार चांगल्या प्रकारे सांभाळून तहसीलदार यांची उणीव भासून दिलेली नाही.
अशा कार्यक्षम व कर्तबगार अधिकाऱ्याची बदली फलटण प्रांत कार्यालयात झालेली आहे. माळशिरस तालुक्यातील जनतेच्या मनामध्ये इच्छा आहे की, पुनश्च माळशिरस तालुक्यात तुषार देशमुख यांनी प्रशासनातील सेवा बजवावी. लोकाभिमुख प्रशासन चालवून अधिकारी व जनता यांचा समन्वय त्यांनी चांगल्या प्रकारे ठेवलेला होता.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे माळशिरस तालुक्यात अनेक वर्ष स्वागत केलेले आहे. मात्र यावर्षी फलटण तालुक्यातून माळशिरस तालुक्यात पालखी देण्याचे काम करण्याची संधी मिळालेली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Great read! The authors perspective is really interesting. Looking forward to more discussions. Click on my nickname for more!