Uncategorizedताज्या बातम्या

माळशिरसच्या लेकीचा तरंगफळ गावात थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच झाल्याबद्दल माहेरात सन्मान…

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील तरंगफळ गावात चुरशीच्या व रंगतदार निवडणुकीत थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच सौ. पद्मिनी नारायण तरंगे व नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य यांचा माळशिरस नगरपंचायत हद्दीतील सिद वस्ती येथे श्री‌. मारुती दादा सिद यांच्या परिवाराकडून सन्मान संपन्न झाला. यावेळी माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य माळशिरस शहराचे माजी सरपंच संयमी नेतृत्व तुकारामभाऊ देशमुख, माळशिरस नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा सौ. लतादेवी सीद, माजी नगरसेवक मारुती उर्फ आप्पासो देशमुख, विद्यमान नगरसेवक रघुनाथ चव्हाण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष सुरेशभाऊ टेळे, सोसायटीचे चेअरमन युवा नेते सचिन देशमुख, अनिल कोळेकर, सोपान वाघमोडे, अरुण लवटे, धुळदेव सिद, भिवा सिद, दत्तात्रय सिद, सुग्रीव सिद, जयवंत सिद, ज्योतीराम वगरे, जगन्नाथ वगरे, सचिन टेळे, भिवा टेळे सर आदी मान्यवरांसह सिद वस्ती ६१ फाटा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. मारुती दादा सिद व सौ. सुशीला मारुती सिद यांना रंजना वगरे, पद्मिनी तरंगे, सत्यभामा कर्णवर पाटील अशा तीन मुली तर, भारत मुलगा आहे व सौ. जयश्री सून, वैभव व धैर्यशील नातू मानसी नात असा परिवार आहे. सिद परिवारातील तरंगफळ गावच्या लोकनियुक्त थेट जनतेतील सरपंच सौ. पद्मिनी नारायण तरंगे व ज्येष्ठ नेते नारायण तरंगे यांच्यासह नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग कांबळे, विक्रम बागाव, श्रीमती जगुबाई जानकर, रानुबाई तरंगे, अश्विनी बोडरे यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी सुजित तरंगे, माणिक बागाव, संजय कोडलकर, गोपीचंद मोहिते, शंकर वलेकर, पांडुरंग बागाव, भीमराव बोडरे, आप्पासो तरंगे, सदाशिव तरंगे, गोरख जानकर, शिवाजी तरंगे, जयंतलाल तरंगे, अभिजीत तरंगे आदी तरंगफळ गावातील मान्यवर उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button