माळशिरसमध्ये भयानक प्रकार उघडकीस, प्रशासनाची डोळ्यावर पट्टी
मुस्लिम दर्गाजवळ चक्क चप्पलांचा साठा
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस शहरामध्ये महिबुब सुभानी यांची दर्गा आहे. ही दर्गा पूर्वीपासून आहे. सध्या या दर्ग्याच्या चारी बाजूंनी अतिक्रमण केले आहे. तर दर्गाच्या मुख्य दरवाजाच्या दोन्हीं बाजूंनी चप्पलांचे दुकान मुबारक जैनुद्दिन मणेरी यांनी टाकले असून महीबुब सूभानी यांचे चपलांचे गोडाऊन दर्गाच्या आतच चक्क केले आहे. यामुळे मुस्लिम बांधवासह हिंदू समाजाच्याहि भावना दुखावल्या जात आहेत.
याबाबतचे निवेदन माळशिरस नगरपंचायत व तहसीलदार यांना मुस्लिम समाजाच्या वतीने देण्यात आले आहे. जर संबंधीत अतिक्रमण काढले नाही तर मुस्लिम समाजाच्या वतीने माळशिरस तहसील वर आंदोलन करण्यात येणार आहे. अशी महिती रशीद इन्नुस मनेरी यांच्यासह मुस्लिम बांधव यांनी दिली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng