माळशिरस तालुका जिल्हा परिषद कर्मचारी संस्थेचे कार्य कौतुकास्पद – मदनसिंह मोहिते पाटील
वाघोली (बारामती झटका)
दि. २५ सप्टेंबर रोजी माळशिरस तालुका जि. प. कर्मचारी संस्थेची २५ वी रौप्य महोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा पंचायत समिती कार्यालय येथील राष्ट्रसंत गाडगे महाराज सभागृहात मा. चेअरमन रवींद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सदर सभेस महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायकजी गुळवे साहेब, सहायक गटविकास अधिकारी किरण मोरे साहेब, माजी सभापती रावसाहेब पराडे, सह. महर्षी शंकरराव मोहिते पाटील सह परिषदेचे प्रदेश अध्यक्ष प्रकाश कराळे, संस्थेचे संस्थापक उत्तमराव माने, गणपतराव वाघमोडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सुरवातीस राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, सह महर्षी शंकरराव मोहिते पाटील, राजमाता अकाकासाहेब यांचे प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
सदर सभेचे प्रस्ताविक मार्गदर्शक व संस्थापक उत्तमराव माने यांनी केले. यावेळी संस्था स्थापनेपासून आढावा सादर केला. तसेच संस्थेने आजपर्यत केलेल्या सामाजिक, शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली. संस्था विजयसिंह मोहिते पाटील, मदनसिंह मोहिते पाटील, आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेली २५ वर्ष कार्यरत असून याही वर्षी संस्थेने ७.२५% लाभांश सभासदांना दिला असल्याचे सांगितले. प्रमुख पाहुण्यांचा संस्थेच्या वतीने चेअरमन रवींद्र पवार, व्हाईस चेअरमन डॉ. विकास तांबडे, संचालक एम. आर. बुगड, कृष्णात बाबर, भारत सांगडे, सावळस्कर भाऊसाहेब, आर.डी. राऊत तसेच श्रीमती भापकर मॅडम यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला.
प्रमुख पाहुण्यांचे हस्ते रौप्य महोस्ववी वर्षानिमित्त माजी संचालक सिद्धेश्वर नागटिळक, अजित देशपांडे, लक्ष्मण नारायणकर, बाळासाहेब संपत गोरे, कौशल्या बाळासाहेब पाटील, अरुण मारुती ठोकळे व सभासदांच्या पाल्यांनी मार्च 2022 मध्ये इयत्ता दहावी व बारावी 85 टक्के पेक्षा गुण प्राप्त केल्याबद्दल संस्थेच्या वतीने पाल्यांचा भेटवस्तू देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात अक्षदा काळे, वरद शिंदे, विजया निंबाळकर, आर्या आंबले, तसेच श्रीपाद सांगडे, माहेश्वरी भापकर, अथर्व आंबले, व श्रेया राजमाने यांचा सन्मान करण्यात आला.
त्यानंतर वसुली कामी सहकार्य केल्याबद्दल सर्व विभागातील कनिष्ठ सहाय्यकांचा संस्थेच्या वतीने भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांचाही सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी साहेब यांच्या सायकल बँक उपक्रमाला संस्थेच्यावतीने सहा सायकल मान्यवरांच्या हस्ते गटशिक्षणाधिकारी श्री. देशमुख साहेब यांना सुपूर्त करण्यात आल्या.
सदर सोहळ्यानंतर सभेच्या कामकाजास सुरुवात झाली. संस्थेचे सचिव राजेंद्र मिसाळ यांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषय वाचून दाखवले असता उपस्थित सभागृहाने सर्व विषयांना सर्वानुमते मंजुरी दिली. तदनंतर प्रमुख पाहुण्यांच्या मनोगतात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. त्या मनोगतात संस्थेचे संस्थापक उत्तमराव माने यांनी स्थापन केलेल्या संस्थेचा 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्व संचालकाचे व संस्थेचे अभिनंदन केले. तसेच संस्थेने सभासदांचे हित जोपासत असताना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेले योगदान हे लक्षणे असून या योगदानाबद्दल संस्थेचे सर्व संचालक मंडळ व सभासदांचे अभिनंदन केले. इथून पुढच्या काळातही संस्थेने असेच कार्य करावे, अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या.
सदरवेळी तांत्रिक ग्राम ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष सुधाकर मुंगूसकर, जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेचे संचालक दीपक गोरे तसेच तसेच संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व कामकाजानंतर आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक श्री. आर. डी. राऊत यांनी केले व उपस्थित प्रमुख पाहुणे व सभासदांना संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने स्नेहभोजन देण्यात आले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng