Uncategorizedताज्या बातम्या

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील बुजुर्ग व्यक्तीमत्व नातेपुते नगरीचे पोलीस पाटील समाजरत्न राजेंद्रभाऊ पाटील याचा वाढदिवस…

नातेपुते ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्याच्या कृषी भागातील बुजुर्ग व्यक्तीमत्व नातेपुते नगरीचे पोलीस पाटील समाजरत्न राजेंद्रभाऊ हनुमंतराव पाटील यांचा दि. २ ऑगस्ट रोजी वाढदिवस असतो‌. राजेंद्रभाऊ यांना अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह सर्व जाती धर्मातील लोक शुभेच्छा देण्यासाठी येत असतात.

स्वातंत्र्यपूर्व काळातील नातेपुते नगरीचे पोलीस पाटील हनुमंतराव माधवराव पाटील व शकुंतलाबाई पाटील यांचे कुटुंब होते. त्यांना तीन मुली व दोन मुले त्यापैकी २ ऑगस्ट १९५२ राजेंद्रभाऊ यांचा जन्म झालेला आहे. पूर्वीच्या काळी पोलीस पाटील म्हणजे गावातील जबाबदार व्यक्तीमध्ये गणना होत होती. गावातील आपांपसातील वाद व तंटे पोलीस पाटील मिटवत असतात. राजेंद्रभाऊ यांनी जुनी मॅट्रिकपर्यंत शिक्षण पूर्ण केलेले होते. लहान बंधू दीड ते दोन वर्षांचे असताना मातोश्री शकुंतलाबाई यांचे दि‌ 26/10/1965 साली दुःखद निधन झालेले होते. हनुमंतराव पाटील यांनी तीन कन्यांचे पिलीव येथील पुकळे, भांबुर्डी येथील वाघमोडे, सातारा येथील गोरड या ठिकाणी विवाह लावून दिलेले होते. राजेंद्रभाऊ यांचा विवाह १९७४ साली गोतंडी गावचे पोलीस पाटील सोपानराव नामदेव पाटील यांची कन्या राजश्री यांच्याशी विवाह झालेला होता. १९ जानेवारी १९८१ साली वडील हनुमंत पाटील यांचे दुःखद निधन झाले. नंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी राजेंद्रभाऊ यांच्या वर आलेली होती.

नातेपुते गावच्या पोलीस पाटील पदाची धुरा २२ जानेवारी १९८६ साली आलेली होती. त्याचं वर्षी समाजभूषण नानासाहेब देशमुख यांनी स्थापन केलेल्या नातेपुते विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन पदाची धुरासुद्धा आलेली होती. राजेंद्रभाऊ यांना वडील स्व. हनुमंतराव पाटील यांच्या विचाराचा वारसा लाभलेला होता. नातेपुते पंचक्रोशीमध्ये ३२ वर्ष पोलीस पाटील पदाची धुरा सांभाळलेली होती. दि. ३१/१२/२०१२ रोजी सेवानिवृत्ती झालेले होती. तरीसुद्धा शासनाने पाच वर्ष प्रभारी पोलीस पाटील म्हणून पदभार ठेवलेला होता. त्या कालावधीत नातेपुतेसह पिंपरी, कारूंडे, धर्मपुरी, मोरोची, कोथळे, फरतडी, निटवेवाडी याही गावांचा पोलीस पाटील पदाचा पदभार होता.

पोलीस पाटील पदावर असताना अनेक गावातील लोकांचे आपांपसातील मतभेद व तंटे मिटवण्यामध्ये राजेंद्रभाऊ यशस्वी झाले होते. चुकीला चूक व बरोबर असणाराची बरोबर असा न्याय असल्याने राजेंद्रभाऊ यांच्या न्याय निवाड्यावर सर्व जाती धर्मातील लोक समाधानी असत. राजेंद्रभाऊ यांनी निपक्षपातीपणे केलेल्या कामाची पोचपावती म्हणून त्यांच्या ५१ व्या वाढदिवसाला समाजरत्न पुरस्कार देऊन नातेपुते व नातेपुते पंचक्रोशीतील ३८ ते ३५ गावातील लोकांनी गुणगौरव केलेला होता.

राजेंद्रभाऊ यांनी पोलीस पाटील पदाची धुरा सांभाळत असताना नातेपुते विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदाची धुरा सुद्धा १९८६ ते २०२२ पर्यंत सांभाळलेली होती. राजेंद्रभाऊ यांनी त्यांना प्रतिकूल परिस्थितीत साथ देणाऱ्या सहकाऱ्यांच्या मुलांना चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची संधी देऊन समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे. मुलगा अतुल बापू व पुतण्या माऊली सोसायटीचे संचालक असताना सुद्धा मित्राच्या मुलांना संधी देण्याचे काम राजेंद्रभाऊ यांनीच केलेली आहे. राजेंद्रभाऊ यांना पाच कन्या व एक पुत्र अतुलबापू पाटील आहेत.

पाटील घराण्याकडे पूर्वीपासून शेतीवाडी, गुरेढोरे सर्व पाटीलकीला शोभेल असे राहणीमान तीन पिढ्यापासून आज सुद्धा पहावयास मिळत आहे. राजेंद्रभाऊ सकाळी शेतामध्ये चक्कर मारून येत असतात‌ शेतामधील कामे रोजंदारी कामगार असतील एक वेळ सांगितले की, मजूर कामे व्यवस्थित करीत असतात. राजेंद्रभाऊ यांच्या शेतामध्ये तीन पिढ्यांपासून काम करणारे लोक आहेत. राजेंद्रभाऊ यांनी वडील हनुमंतराव पाटील यांचा आदर्श घेऊन समाजकारण व राजकारण केले. समाजामध्ये राजेंद्रभाऊ यांनी घराण्याची प्रतिष्ठा जोपासलेली आहे. त्यांचाच वसा आणि वारसा पुढे नेण्याचे काम अतुलबापू करीत आहे. राजेंद्रभाऊ सारख्या बुजुर्ग व्यक्तिमत्व असणाऱ्या दिलदार, दिलखुलास, मनमिळावू अशा ग्रामीण भागातील रांगड्या व्यक्तिमत्वाला बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्युब चॅनेलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांचेकडून अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त लाख लाख शुभेच्छा आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button