माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात आदर्शवत कुटुंब, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या स्वप्नील यांनी स्वप्न पूर्ण केले.
स्वतः पक्षाचे उपाध्यक्ष, पत्नी माजी सरपंच, दोन मुले पोलीस प्रशासनात, सुन उच्चशिक्षित, विवाहित मुलगी ग्रामपंचायत सदस्य दोन्ही भाऊ विभक्त असताना मिळून मिसळून वागणारे आदर्श नेतृत्व….
नातेपुते (बारामती झटका)
डोंबाळवाडी (कुरबावी), ता. माळशिरस, गावचे सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे भारतीय जनता पार्टीचे माळशिरस तालुका उपाध्यक्ष महादेव केसकर उर्फ मामा यांचे चिरंजीव स्वप्निल उर्फ दत्तात्रय महादेव केसकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत मुंबई पोलीस दलात सेवा करण्याची संधी मिळवली असल्याने स्वप्निल यांनी स्वप्न पूर्ण केलेले असल्याने केसकर परिवारासह डोंबाळवाडी पंचक्रोशीमध्ये कौतुकांचा वर्षाव होत आहे. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात आदर्शवत केसकर कुटुंब राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहे. स्वतः महादेव मामा भारतीय जनता पक्षाचे माळशिरस तालुका उपाध्यक्ष आहेत. पत्नी सौ. सुमित्रा महादेव केसकर यांनी डोंबाळवाडी गावचे सरपंच पद भूषवलेले आहे. थोरला मुलगा श्री. वैभव उर्फ नवनाथ महादेव केसकर पुणे शहर पोलीस सेवेत कार्यरत आहे. सुनबाई सौ. अंजली वैभव केसकर उच्चविद्या विभूषित आहेत. मुलगी सौ. वर्षाराणी सोमनाथ बोरकर, विझोरी ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य आहेत.
श्री. महादेव केसकर उर्फ मामा यांना रामचंद्र व दशरथ असे दोन बंधू आहेत. विभक्त असतानासुद्धा मिळूनमिसळून वागणारे आदर्श नेतृत्व म्हणजे महादेव केसकर उर्फ मामा आहेत. जरी वेगवेगळे स्वयंपाक करीत असलर तरी, सकाळी-संध्याकाळी एकत्र जेवण करण्याची आजसुद्धा परंपरा सुरू आहे. भावाभावामध्ये व जावाजावामध्ये कधीही कलह झालेला नाही, असे आदर्शवत केसकर कुटुंब आहे. सर्वांची घरातील देवांची नावे आहेत. त्यामुळे “मुह मे राम बगल मे छुरी” असा प्रकार कधीच पहावयास मिळालेला नाही. समाजामध्ये वावरत असताना सामाजिक कार्याची पहिल्यापासून आवड आहे. सामाजिक कार्य करीत राजकारणामध्ये सुद्धा चांगले काम केलेले असल्याने त्यांच्या धर्मपत्नी यांना सरपंच पदाचा बहुमान मिळालेला होता. प्रतिकूल परिस्थितीत दोन्ही मुलांनी शिक्षण घेऊन पोलीस दलामध्ये नोकरी करून समाजाची व देशाची सेवा करीत आहेत. सुनबाई सुद्धा उच्च शिक्षित असून केसकर परिवार यांना साजेल अशा सुनबाई मिळालेल्या आहेत. जावईसुद्धा राजकीय क्षेत्रात वावरत असल्याने मुलीला ग्रामपंचायत सदस्य होऊन सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात डोंबाळवाडी कुरबावी पंचक्रोशीत आदर्शवत कुटुंब राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या कुटुंबातील स्वप्निल यांनी परिवाराचे स्वप्न पूर्ण केलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng