माळशिरस तालुक्यातील खुडूसचे डॉ. सर्जेराव दोलतडे करणार फ्रांस दौऱ्यासाठी भारताचे प्रतिनिधित्व
माळशिरस विधानसभेचे आरोग्यदूत लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी कार्यकर्तृत्वाचे अभिनंदन केले.
खुडूस (बारामती झटका)
यूरोप मधील सर्वात मोठा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर महोत्सव “विवाटेक 2023” हा फ्रान्स या देशाची राजधानी पॅरिस येथे दि. 14 ते 17 जून 2023 रोजी आयोजित केला आहे. जगभरातील देश नवीन टेक्नॉलॉजिचे प्रदर्शन करून आपली ताकद दाखवणार आहेत. यासाठी भारताने सुद्धा जोरदार तयारी केली असून उत्कृष्ट संशोधन निर्मित स्टार्टअप कंपन्यांची निवड केली आहे.
भारतीय स्टार्टअप युरोपमध्ये आपला डंका नक्कीच वाजवणार असून तरुण शास्त्रज्ञ डॉ. सर्जेराव दोलतडे यांची निवड परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकारने केली आहे. आपल्या देशाची मान नक्कीच अजून उंचावून येणार असल्याचे डॉ. सर्जेराव दोलतडे यांनी सांगितले.
भारतात टेक्नॉलॉजीवर आधारित कंपन्यांचे सध्याचे युग असून यामध्ये प्रामुख्याने भारत जगात अमेरिकेपाठोपाठ दुसऱ्या नंबरवर असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच पहिला क्रमांक पटकावन्याची त्यांना आशा आहे.
सर्जेराव दोलताडे यांना यशस्वी कामगिरीसाठी आरोग्यदूत माळशिरस तालुक्याचे दमदार आमदार रामभाऊ सातपुते साहेब यांनी फोनवरून अभिनंदन केले व पुढील कामास शुभेच्छा दिल्या.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Great read with a touch of humor! For further details, check out: READ MORE. What are your thoughts?