Uncategorized

माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या छाननीत 4 सरपंच तर 14 ग्रामपंचायत सदस्य यांचे उमेदवारी अर्ज बाद

तालुक्यातील 35 गावच्या थेट जनतेतील सरपंच पदाचे 203 तर, 1288 ग्रामपंचायत सदस्य यांचे उमेदवारी अर्ज वैध झाले.

माळशिरस (बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील 35 गावच्या ग्रामपंचायतची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. थेट जनतेतील सरपंच पदाची निवडणूक असल्याने 207 सरपंच पदाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी चार सरपंच पदाचे उमेदवार यांचे अर्ज अवैध झालेले आहेत तर 203 सरपंच पदाचे उमेदवार यांचे अर्ज वैध झालेले आहे.

ग्रामपंचायत 1302 सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते. त्यापैकी 14 ग्रामपंचायत सदस्य यांचे उमेदवारी अर्ज अवैध झालेले आहेत तर 1288 अर्ज वैध झालेले आहेत.

थेट जनतेतील सरपंच पदाचे वेळापूर येथील 2 उमेदवार, धानोरे येथील 1, नेवरे येथील 1 असे उमेदवारांचे अर्ज बाद झालेले आहेत.

ग्रामपंचायत सदस्यांमध्ये कचरेवाडी 1, वेळापूर 3, धानोरे 3, माळेवाडी बोरगाव 1, फळवणी 1, गुरसाळे 1, मेडद 1, तामसिदवाडी 1, मारकडवाडी 1, पिसेवाडी 1, असे 14 उमेदवार यांचे अर्ज बाद झाले आहेत.

माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर, निवासी नायब तहसीलदार तुषार देशमुख, नायब तहसीलदार आशिष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सोमवार दि. 05/12/2022 रोजी शांततेमध्ये तहसील कार्यालय येथे उमेदवारी अर्जाची छाननी संपन्न झालेली आहे. उमेदवारी अर्ज पाठीमागे घेण्याची दि. 07/12/2022 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत असल्याने 3 नंतर चिन्ह वाटप झाल्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button