माळशिरस तालुक्यातील थेट जनतेतील सरपंच पदासाठी २४ तर सदस्य पदासाठी ११९ अर्ज दाखल
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतील सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. दि. २८/११/२०२२ पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. सदरची निवडणूक प्रक्रिया तहसीलदार जगदीश निंबाळकर, निवासी नायब तहसीलदार तुषार देशमुख, नायब तहसीलदार आशिष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. गावनिहाय सरपंच पदासाठी २४ तर सदस्य पदासाठी ११९ अर्ज दाखल झालेले आहेत.
दि. २८/११/२०२२ रोजी खंडाळी दत्तनगर येथे सदस्य पदासाठी ४ तर सरपंच पदासाठी १, मेडद येथे सरपंच पदासाठी १, निमगाव येथे सरपंच पदासाठी १, तर वेळापूर येथे सदस्य पदासाठी २ तर सरपंच पदासाठी एकही अर्ज आलेला नाही. असे एकूण यादिवशी सदस्य पदासाठी ६ तर सरपंच पदासाठी ३ उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत.
दि. २९/११/२०२२ रोजी तरंगफळ येथे सरपंच पदासाठी १, मोटेवाडी येथे सरपंच पदासाठी २, कचरेवाडी येथे सदस्य पदासाठी ४ तर सरपंच पदासाठी १, तामशिदवाडी येथे सदस्य पदासाठी २ तर सरपंच पदासाठी १, पुरंदावडे येथे सदस्य पदासाठी १, काळमवाडी येथे सरपंच पदासाठी १, चांदापुरी येथे सदस्य पदासाठी १, खंडाळी दत्तनगर येथे सदस्य पदासाठी ८, संगम येथे सदस्य पदासाठी १ तर सरपंच पदासाठी १, आनंदनगर येथे सदस्य पदासाठी २, बागेवाडी येथे सदस्य पदासाठी १ तर सरपंच पदासाठी १, मेडद येथे सदस्य पदासाठी १३ तर सरपंच पदासाठी २, निमगाव येथे सदस्य पदासाठी ५, पानीव येथे सदस्य पदासाठी १ असे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. असे एकूण यादिवशी सदस्य पदासाठी ३९ तर सरपंच पदासाठी १० उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत.
दि. ३०/११/२०२२ रोजी पठाणवस्ती येथे सदस्य पदासाठी २, कचरेवाडी येथे सदस्य पदासाठी ५, तीरवंडी येथे सदस्य पदासाठी २, संगम येथे सदस्य पदासाठी ७ तर सरपंच पदासाठी १, मोटेवाडी येथे सदस्य पदासाठी ३, गुरसाळे येथे सदस्य पदासाठी १ तर सरपंच पदासाठी १, पळसमंडळ येथे सदस्य पदासाठी १, मारकडवाडी येथे सदस्य पदासाठी ३ तर सरपंच पदासाठी १, निमगाव येथे सदस्य पदासाठी १, मेडद सदस्य पदासाठी १३ तर सरपंच पदासाठी १, फळवणी येथे सदस्य पदासाठी २१ तर सरपंच पदासाठी २, पुरंदावडे सदस्य पदासाठी १ तर सरपंच पदासाठी ४, सदाशिवनगर सदस्य पदासाठी १४ तर सरपंच पदासाठी १ असे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. असे एकूण यादिवशी सदस्य पदासाठी ७४ तर सरपंच पदासाठी ११ उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत.
अजून २ तारखेपर्यंत मुदत शिल्लक राहिली आहे. नवीन अपडेट रोज जाणून घेवूयात.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good. https://www.binance.com/ph/register?ref=OMM3XK51
It’s very interesting! If you need help, look here: hitman agency
Latoysha Morantes