Uncategorized

माळशिरस तालुक्यातील वटफळी परिसरात बिबट्याचे दर्शन, नागरिकांनी सतर्क तर वनविभागाने दक्ष राहावे.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील वटफळी परिसरात कचरेवाडीचे नेते हनुमंत सरगर यांना बिबट्याचे दर्शन झालेले आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे जात असताना बिबट्या पाहिलेला आहे. तरी वटफळी परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावे. तालुक्यातील वन विभागाने यंत्रणा कामाला लावून दक्ष रहावे.

काही महिन्यापूर्वी फळवणी येथे बिबट्याचे दर्शन रात्रीच्या वेळी झालेले होते. चार चाकी गाडी असल्यामुळे मोबाईल मध्ये कैद करता आला. सदरचा बिबट्या असावा असा अंदाज आहे, कारण अजून कोणाला दृष्टीस पडलेला नाही. बिबट्या नरभक्षक नसावा अद्यापपर्यंत मानवावर हल्ला केलेला नाही. फळवणी येथील तोच आहे का नवीन आहे हे माहित नाही, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Back to top button