माळशिरस तालुक्यात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर वरूणराजाने हजेरी लावली आहे.

तालुक्यातील अनेक ठिकाणी कमी जास्त प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत असल्याने बळीराजा सुखावला जाणार आहे.
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर वरूणराजाने सकाळपासून हजेरी लावलेली आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी कमी जास्त प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत असल्याने बळीराजा सुखावला जाणार आहे.
महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. अशावेळी बळीराजाला पावसाची प्रतीक्षा करायला लावलेली होती. अनेकांच्या तोंडामधून, जिथे पडायला पाहिजे तिथे पडत नाही आणि नको त्या ठिकाणी पाऊस पडत आहे, अशी चर्चा पाऊस न पडलेल्या बळीराजांमधून होती. त्याला माळशिरस तालुकासुद्धा अपवाद होता. कारण, माळशिरस तालुक्यात काही ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली होती. परंतु, काही ठिकाणी अद्यापही पडलेला नव्हता. त्यामुळे त्या परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त होते. काही शेतकऱ्यांनी पाठीमागील पावसांवर शेतामध्ये पिके उभा केलेली होती. उभ्या पिकांना पाण्याची गरज होती तर नवीन पिके पेरणी करण्याकरता पावसाची गरज होती. अशा दुहेरी संकटातील बळीराजा वरूणराजाच्या आगमनासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आकाशाकडे नजर लावून होता.

आज सकाळी सूर्योदयाच्या आगमनापूर्वीच वरूणराजाचे आगमन झालेले आहे. तालुक्यात कमी जास्त प्रमाणात पाऊस सकाळपासून संततधार सुरू आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून न जाता शेतामध्ये मुरत आहे, असे दोन-तीन चांगले सडाके पावसाचे झाल्यानंतर बळीराजाच्या पेरणीची लगबग सुरू होईल. खऱ्या अर्थाने वरूणराजाच्या आगमनावर अनेकांचे अर्थकारण चालत असते. माळशिरस तालुक्यात प्रतीक्षेनंतर वरूनणराजाची हजेरी लागलेली असल्याने बळीराजा सुखावला जाणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng