माळशिरस तालुक्यात राजकीय उलथापालथ, विजयदादा सुभाष अण्णांच्या निवासस्थानी, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष के. के. पाटील होते.
विजयसिंह मोहिते पाटील यांनी रामाची भूमिका बजवावी लक्ष्मणाच्या भूमिकेमध्ये काम करण्यास तयार आहे – ॲड. सुभाष बाळासाहेब पाटील.
भारतीय जनता पार्टीचे ‘आम्ही मतदार पाटीचे लोकार्पण सोहळा’ माळशिरस येथे सुभाष अण्णांच्या निवासस्थानी कार्यक्रम संपन्न झाला.
माळशिरस ( बारामती झटका )
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व माढा लोकसभेचे माजी खासदार विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते भारतीय जनता पार्टीचे ‘आम्ही मतदार पार्टीचे लोकार्पण सोहळा’ एकेकाळचे विधानसभेचे कट्टर प्रतिस्पर्धी शेळी मेंढी महामंडळाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ विधीतज्ञ ॲड. सुभाष बाळासाहेब पाटील यांच्या माळशिरस येथील निवासस्थानी कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा प्रभारी भाजपचे प्रांतिक सदस्य व माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य के.के. पाटील होते.

सदर कार्यक्रमास शिवामृत दूध उत्पादक संघाचे चेअरमन भाजपचे जिल्हा संघटन महामंत्री धैर्यशील मोहिते पाटील, माळशिरस नगरपंचायतीचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते सोपानकाका नारनवर, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, ज्येष्ठ नेते गजानन पाटील, युवा नेते प्रताप पाटील, अहिल्यादेवी विकास संस्थेचे चेअरमन संदीप पाटील, भाजपचे माळशिरस शहराध्यक्ष संतोष वाघमोडे, युवा मोर्चाचे माळशिरस तालुका उपाध्यक्ष युवराज वाघमोडे यांच्यासह अनेक मान्यवर व भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाप्रसंगी ॲड. सुभाष पाटील बोलताना म्हणाले कि, माळशिरस विधानसभेच्या निवडणुकीत राजकारणात वैचारिक विरोध होता मात्र मतभेद नव्हते. भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर अनेक वेळा निवडणूक लढवली होती मात्र विजयदादा मंत्रिमंडळाच्या कारकिर्दीत विकासकामाच्या जोरावर विजय मिळवत होते. राजकारण बाजूला ठेवून कौटुंबिक संबंध पाटील आणि मोहिते पाटील घराण्याने जपलेले आहेत. स्वर्गीय राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांचे दुःखद निधन झाल्यानंतर शिवरत्न बंगल्यावर जाऊन अंतिम दर्शन घेतलेले होते. राजकारणात कौटुंबिक संबंध कधीही आणलेले नाहीत. विजयदादांनी राजकारण करीत असताना दुजाभाव कधीही केलेला नाही. उजनीच्या कार्यक्षेत्रात न येणारी गावे समाविष्ट करून खऱ्या अर्थाने चांगले काम केलेले आहे, त्याचेही कौतुक करण्यात आले. मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माळशिरस तालुक्यामधील भाजपच्या जनतेची अनेक वर्षाची इच्छा खासदार व आमदार भाजपचा व्हावा ही इच्छा पूर्ण केलेली आहे. भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यावर प्रभावित होऊन विजयदादांनी रामाची भूमिका बजवावी लक्ष्मणाच्या भूमिकेत काम करण्यास तयार असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी के. के. पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, बाळासाहेब सरगर यांनीही आपले विचार व्यक्त केले होते.




माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील यांना सुभाषअण्णा यांनी कोणतेही सहकारी संस्था व आर्थिक पाठबळ नसताना मोठे कडवे आव्हान उभे केलेले होते. दोन दिग्गज एकाच व्यासपीठावर असताना मोहिते पाटील यांचे पारंपारिक विरोधक के. के. पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष असल्यामुळे माळशिरस तालुक्यात राजकीय उलथापालथ झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng