माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गळती, युवा नेते तुषार पाटील यांच्या मागणीला वाढता पाठिंबा..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बंडाळीमुळे राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक मंदावणार का ?
माळशिरस (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य व माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांचे खंदे समर्थक करूंडे गावचे युवा नेते तुषार पाटील यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका सरचिटणीस व पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गळती लागलेली असून युवा नेते तुषार पाटील यांच्या मागणीला वाढता पाठिंबा मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बंडाळीमुळे राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक मंदावणार का ?, असा प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये चर्चिला जात आहे.

कारूंडे गावचे युवा नेते तुषार पाटील यांनी राजीनामा देण्याचे कारण स्पष्ट केल्यानंतर मांडवे गावचे युवा नेते महादेव जगन्नाथ वाघमोडे यांनी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुका उपाध्यक्ष व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. तसेच डोंबाळवाडी गावचे युवा नेते अमोल पांडुरंग रुपनवर यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. तरंगफळ गावचे युवा नेते अभंगराजे दादासाहेब तरंगे यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देऊन तिनही युवकांनी तुषार पाटील यांच्या मागणीला पाठिंबा देऊन पक्षीय अंतर्गत कुरघोड्या असल्या कारणाने व वरिष्ठ मंडळी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने राजीनामा देत आहेत.

मात्र उत्तमराव जानकर यांचे काम प्रामाणिकपणे करत राहून आपल्या सर्वांचे प्रेम व सहकार्य कायम असू द्या, अशा प्रकारे तीन पदाधिकारी यांनी पदासह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
