Uncategorizedताज्या बातम्या

माळशिरस तालुक्यात सामुहिक राष्ट्रगीताने साधु वाण्याची नौका जागच्या जागी थांबली.

माळशिरस नगरपंचायतीच्या हद्दीत आजादी का अमृत महोत्सवानिमित्त सामुहिक राष्ट्रगीतावेळी घडलेला प्रकार…

माळशिरस ( बारामती झटका )

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात आजादी का अमृत महोत्सव निमित्त सामुहिक राष्ट्रगीत माळशिरस नगरपंचायतीच्या हद्दीत सुरू झाल्यानंतर सत्यनारायणाच्या कथेतील साधू वाण्याची व्यापारासाठी निघालेली नौका जागच्या जागी थांबली. यावेळी सत्यनारायणाची पूजा थांबवून सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले.

माळशिरस शहरात टेळे कॉम्प्लेक्सची नव्याने उभारणी करण्यात आली आहे. नवीन वास्तुच्या गृहप्रवेशानिमित्त सत्यनारायण पूजा सकाळी चालू करण्यात आली होती. सत्यनारायण कथेतील साधू वाणी व्यापार करण्यासाठी पाण्यातून नौकेत बसून व्यापारासाठी निघालेला आहे. सत्यनारायण कथेतील प्रसंगाचे वाचनसुरू असताना बरोबर अकरा वाजता पूजा थांबून आजादी का अमृत महोत्सव यानिमित्त स्वराज्य महोत्सव अंतर्गत सामूहिक राष्ट्रगीत गायन केले. राष्ट्रगीतावेळी साधू वाण्याची नौका जागच्या जागी थांबलेली होती. राष्ट्रगीत संपल्यानंतर पुन्हा सत्यनारायण कथेला सुरुवात झाली.

यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष सुरेशभाऊ टेळे, माळशिरस नगरपंचायतीच्या कर्तव्यदक्ष नगरसेविका रेश्माताई टेळे, सार्वजनिक विद्यामंदिर रावेरचे प्राचार्य सोपान शेंडगे, हरिदास टेळे सर, पुरोहित शरदकाका, निवृत्ती टेळे, भीमराव टेळे, शिवाजीराव वाघमोडे, एमएसईबीचे अभियंता सुनील टेळे, श्रीमंत वाघमोडे, बिरुदेव वळकुंदे, ग्रामसेविका सौ. कमल टेळे, सुभाष टेळे, देविदास टेळे आदींसह टेळे परिवारातील इतर सदस्य व नातेवाईक उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button