ताज्या बातम्याराजकारण

लवंग ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सज्जन दुरापे यांची निवड…

वाघोली (बारामती झटका)

ग्रामपंचायत लवंग चे उपसरपंच प्रशांत बेलारे यांनी राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पदाची जागा रिक्त होती. उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया ग्रामपंचायत कार्यालय लवंग मध्ये नुकतीच पार पडली.

सदर निवड प्रक्रियेसाठी एकूण 13 सदस्यांपैकी सात सदस्य उपस्थित होते. उपसरपंच या पदासाठी निवडणूक कार्यक्रम प्रमाणे श्री. सज्जन दुरापे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी पंचायत समिती माळशिरसचे विस्तार अधिकारी श्री. सरोदे यांनी उपसरपंच पदी श्री. सज्जन दुरापे यांची निवड झाल्याची जाहीर केले. सज्जन दुरपे यांची उपसरपंच पदी निवड झाल्याचे जाहीर होताच ग्रामपंचायतीच्या प्रांगणात फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करून ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

निवडणूक प्रक्रियेनंतर ग्रामपंचायतीचे गटनेते माजी सरपंच निशांत पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच सज्जन दुरापे यांचा सत्कार करण्यात आला. गावातील ज्येष्ठ नेत्यांनीही सज्जन दुरापे यांचा सन्मान करून त्यांना शुभेच्छा दिल्या. निवडीनंतर महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री श्री. विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन श्री. जयसिंह मोहिते पाटील, माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री. शिवतेजसिंह मोहिते पाटील, शिवरत्न उदयोग समूहाचे श्री. कीर्तीध्वज मोहिते पाटील, लवंग ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. प्रशांत पाटील यांनी सज्जन दुरापे यांचा सन्मान करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

सदर वेळी चंद्रशेखर दुरापे, उत्तम भिलारे, उत्तमराव भोसले, विश्वंभर वाघ, दत्तात्रेय चव्हाण, युवराज वाघ, तानाजी रणसिंग, प्रशांत भिलारे, महादेव भोळे, विठ्ठल भोसले, लालासाहेब दुरापे, प्रकाश गायकवाड, माऊली वाघ, गोरख वाघ, जयवंत चव्हाण, सहकार महर्षी कारखान्याचे माजी संचालक धनंजय चव्हाण, राजकुमार पाटील, नितीन वाघ, अमोल दुरापे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पंचायत समिती माळशिरसचे कृषी विस्तार अधिकारी सरवदे साहेब व ग्रामपंचायत अधिकारी श्री. मिटकल भाऊसाहेब यांनी काम पाहिले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom