माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांची भाजपच्या प्रदेश कार्यकारणीत निमंत्रक पदी वर्णी लागली…
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, राजकुमार पाटील, के. के. पाटील यांच्या नियुक्तीसोबत नव्याने डॉ. आप्पासाहेब देशमुख यांची नियुक्ती..
माळशिरस ( बारामती झटका )
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारणीत महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे विशेष निमंत्रित माजी संचालक भाजपचे प्रांतिक सदस्य राजकुमार पाटील, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य के. के. पाटील यांच्या भाजप प्रदेश विशेष निमंत्रित सोबत नव्याने माळशिरस नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब एकनाथ देशमुख यांची भाजपच्या कार्यकारणीत निमंत्रकपदी वर्णी लागलेली आहे.
आप्पासाहेब देशमुख यांनी माळशिरस नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकविलेला आहे. माळशिरस शहरासह तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाची ध्येयधोरणे व विचारधारा पोचवण्याचे काम माढा लोकसभेचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
आप्पासाहेब देशमुख यांनी श्रीनाथ विद्यालय व जुनिअर कॉलेज यांच्या माध्यमातून माळशिरस पंचक्रोशीमध्ये शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविलेला आहे. श्रीनाथ मित्र मंडळ व आप्पासाहेब देशमुख मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहून आप्पासाहेब देशमुख यांचे राजकीय, सामाजिक व शैक्षणिक कार्य जोमाने सुरू आहे. त्यांच्याकडे भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशचे पद होते. भारतीय जनता पक्षाने टाकलेली जबाबदारी यशस्वीपणे आप्पासाहेब देशमुख यांनी सांभाळलेली असल्याने भाजपच्या प्रदेश कार्यकारणीत निमंत्रक पदी वर्णी लागली असल्याने डॉ. आप्पासाहेब देशमुख यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
This article had me laughing and learning! For additional insights, check out: EXPLORE NOW. Any thoughts?