माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांचा मित्र परिवारांच्या वतीने सन्मान संपन्न…
भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी निमंत्रित सदस्यपदी निवड झाल्याबद्दल नगरपरिषदेचे संलग्न असणाऱ्या मित्र परिवाराने केले सन्मानित…
माळशिरस (बारामती झटका)
श्रीनाथ विद्यालय व जुनिअर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष माळशिरस नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब एकनाथ देशमुख यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी निमंत्रित सदस्यपदी निवड झाल्याबद्दल नगरपरिषदेचे संलग्न असणाऱ्या मित्र परिवारांच्यावतीने सन्मानित करण्यात आले. यावेळी ॲड. दादासाहेब पांढरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष युवा नेते सुरेशभाऊ टेळे, युवा नेते रशीदभाई शेख, युवा उद्योजक सचिनआप्पा वावरे, युवा नेते आजिनाथ वळकुंदे, युवा नेते महादेव कोळेकर, नगरसेवक रघुनाथ चव्हाण, नगरसेवक आबासाहेब धाईंजे, माजी उपनगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख, नगरसेवक दादासाहेब शिंदे, नगरसेवक कैलास वामन आदी मान्यवर उपस्थित होते.
माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांच्या भाजपच्या सन्मानपूर्वक निवडीबद्दल माळशिरस नगरपंचायतीचे नगरसेवक व ज्यांच्या धर्मपत्नी नगरसेविका आहेत, असे युवा नेते युवा उद्योजक सर्वांच्या वतीने सन्मान करण्यात आलेला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng