ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

क्रांतिकारी व शूरवीरांच्या जिल्ह्यात हृदयस्पर्शी नेता जयाभाऊ……

निराधारांना आधार देणारा लोकप्रतिनिधी असल्याने मतदारांचा जनाधार असलेला माणदेशी संघर्ष योद्धा….

माण (बारामती झटका)

महाराष्ट्रात सातारा जिल्ह्याची क्रांतिकारी व शूरवीरांचा जिल्हा अशी ओळख आहे. सातारा जिल्ह्यात हृदयस्पर्शी नेता जयाभाऊ यांनी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बाधित शेतकऱ्यांचे अश्रू पुसले. अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घराची पडझड झाली. निराधार असलेल्या संगीता यांच्याही घराची पडझड झालेली होती. निराधारांना आधार देणारा लोकप्रतिनिधी असल्याने मतदारांचा जनाधार असलेला माणदेशी संघर्ष योद्धा तथा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री नामदार जयकुमार गोरे नुकसान ग्रस्त पाहणी करीत असताना सख्ख्या भावापेक्षा जीवाभावाचा भाऊ यांच्या गळ्यामध्ये संगीताने टाहो फोडल्यानंतर उपस्थितीतांच्या काळजाचे सश्याच्या काळजासारखे पाणी झालेले होते.

प्रतिकूल परिस्थितीतून संघर्षमय वाटचाल करीत जिल्हा परिषद सदस्य पासून राजकारणाला व समाजकारणाला सुरुवात केलेली होती. माण खटाव विधानसभा मतदार संघात मतदारांनी विश्वास ठेवून मतदान केले आणि माणदेशी दुष्काळी जनतेचा नेता पहिल्यांदा विधानसभेत आमदार झाला. प्रतिकूल परिस्थितीत आई-वडिलांच्या संस्काराची शिदोरी घेऊन दुष्काळी जनतेचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून दुष्काळी कलंक पुसण्यासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, बाळासाहेब देसाई, आर. आर. आबा पाटील, पतंगराव कदम, हिंदुराव नाईक निंबाळकर, यांच्या विचाराचा वारसा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या विकासात्मक व दूरदृष्टीच्या राजकारणाच्या पावलावर पाऊल ठेवत मानदेशी योद्धा जयाभाऊ यांची वाटचाल सुरू आहे. चौथ्यांदा माण-खटाव मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत असताना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात ग्रामविकास व पंचायत राज मंत्री पदाची जबाबदारी शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या आशीर्वादाने मिळाली. तर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी श्री विठ्ठल रुक्मिणी व अक्कलकोटचे स्वामी समर्थ, सोलापूरचे सिद्धेश्वर त्यांच्या कृपा आशीर्वादाने संधी मिळालेली आहे.

अनेकांच्या जन्मापासून कधीही मे महिन्यामध्ये पावसाळ्यासारखा पाऊस पडलेला नव्हता. सर्व ठिकाणी आठ दिवस वरूणराजाने दमदार हजेरी लावलेली होती. अनेक तालुक्यात व जिल्ह्यात पावसामुळे पिके, फळबाग कांदा टोमॅटो रस्ते, पूल व घरांचे नुकसान झालेले होते.

ग्रामविकास मंत्री तथा माण खटावचे आमदार जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांनी मतदार संघातील नुकसानग्रस्त भागांचा झंजावाती दौरा केलेला होता. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, जिल्हा कृषी अधिक्षक भाग्यश्री फरांदे, प्रांत उज्वला गाडेकर, तहसिलदार विकास अहिर, मुख्याधिकारी सचिन माने, गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, अधिक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, बांधकामसह शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी, मा. जिल्हा परिषद सदस्य अर्जुन (तात्या) काळे, संजय (काका) गांधी, मा. जिल्हा परिषद सदस्य श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे (आबा), मा.जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव शिंदे, ज्येष्ठनेते हरिभाऊ जगदाळे, मा. सभापती विलासराव देशमुख, विधानसभा प्रमुख विक्रमसिंह (सोमनाथ) भोसले, रमेश गावडे पाटील, दादासाहेब काळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किसन सस्ते, माण तालुका (दहिवडी मंडल) भाजपा अध्यक्ष गणेश सत्रे, म्हसवड मंडल अध्यक्ष प्रशांत गोरड, एडवोकेट दत्तात्रय हांगे, परकंदी गावचे सरपंच बाळासाहेब कदम, सुनील पोरे साहेब, म्हसवडचे मा. नगराध्यक्ष विजय धट, युवानेते लुनेश विरकर, अल्पसंख्यांक आघाडी मोर्चा जिल्हा अध्यक्ष अकिल काझी, निलेश दडस, विक्रम कदम यांच्यासह पत्रकार बांधव व अतिवृष्टी नुकसान पाहणी दौऱ्यातील गावचे ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.

पावसामुळे नुकसानग्रस्त रस्ते, पूल, पिके व फळबागा यांची पाहणी करीत असताना घरांच्याही पडझड झालेल्या पीडित लोकांच्या भेटीगाठी सुरू होत्या. निराधार असणाऱ्या संगीता यांच्याही घराची पडझड झालेली होती. कोणाचाच आधार नव्हता. त्या महिलेला माहीत होते, खरा आधारवड आपल्या दारापर्यंत आलेला आहे. त्या महिलेने जयाभाऊ यांच्या गळ्यात पडून टाहो फोडलेला होता. संगीताला धीर देत त्यांनी घराची पाहणी केली. त्याच ठिकाणी घरकुलाची व्यवस्था करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. खरंच निराधार जनतेसाठी नेता कसा असावा संघर्ष योद्धा जयाभाऊ यांच्या समयसूचक निर्णयावरून अनुभवले जात आहे.

समाजामध्ये काही लोकप्रतिनिधी असतात माझीच गाडी आणि माझ्याच बायकोची गोल गोल साडी असे पाहायला मिळते. परंतु, संगीताची मळकटलेली साडी भाऊंनी मायेने संगीताला धीर देऊन खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी कसा असावा याचा अनुभव उपस्थितांना आलेला आहे. प्रथमदर्शनी भाऊंकडे पाहिल्यानंतर कडक व रागीट स्वभाव आहे असे जाणवते. मात्र, वरून दिसणारे फणसासारखे भाऊ आतून मऊ आहेत याचा अनुभव उपस्थितांना आलेला आहे. संगीता आणि जया भाऊ यांची गळाभेट वृत्तवाहिन्यांनी आपल्या चॅनलमध्ये कैद केलेली आहे. वाऱ्यासारखी बातमी जगामध्ये पसरलेली होती. अनेकांच्या स्टेटसला, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप वर व्हिडिओ फिरत होता. निराधारांना आधार देणारा लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थाने मतदारांच्या मनावर अधिराज्य करणारा मानदेशी संघर्ष योद्धा जयाभाऊ यांच्यातील आपुलकी, प्रेम, जिव्हाळा व माणुसकीचे दर्शन झालेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom