माळशिरस पंचायत समितीचे प्रशासक असणारे गटविकास अधिकारी यांच्यावर सरपंच, उपसरपंच यांची नाराजी..
सरपंच, उपसरपंच यांना दरडावून खेकसून अपमानास्पद बोलून मानहानी करण्याच्या प्रकारामुळे तीव्र नाराजीचे सूर उमटत आहेत.
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. विनायक गुळवे यांच्याकडे सभापती व उपसभापती यांचा कालावधी संपलेला असल्याने प्रशासक पदाची जबाबदारी एक वर्षापेक्षा अधिक काळ आहे. प्रशासक असणारे गटविकास अधिकारी सरपंच, उपसरपंच यांना दरडावून, खेकसुन, अपमानास्पद बोलून मानहानी करण्याचा प्रकार सुरू असल्याने सरपंच व उपसरपंच यांच्यामधून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.
अनेक ठिकाणी सरपंच व उपसरपंच यांची दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरू आहे.
पंचायत समिती मार्फत ग्रामपंचायत स्तरावरील सर्व विकासकामे सुरू असतात. अनेक ठिकाणी ग्रामसेवक हे गटविकास अधिकारी यांचे हस्तक असतात. विकासाची कामे करीत असताना गावचा विकास न पाहता आर्थिक विकास पाहिला जातो. अशावेळी ग्रामसेवक गावाच्या हितासाठी कामांमध्ये बदल करीत नाहीत तर अधिकारी यांचे संगणमत करून बदल करीत असतात. अशावेळी सरपंच व उपसरपंच सांगत असतात, असा बदल करून चालणार नाही, जनतेची अडचण आहे. तरीसुद्धा गटविकास अधिकारी यांचेकडून सरपंच व उपसरपंच यांना अपमानास्पद बोलून त्यांचे ऐकून घेतले जात नाही. असे सरपंच व उपसरपंच यांच्यामधून दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. लोकसंख्येच्या आधारित निकषावर निधी खर्च करणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी शिक्षण, आरोग्य, उपजीविका, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ता, गटार या ठिकाणी कामे करीत असताना अनेक ठिकाणी अनियमितता पहावयास मिळत असते. अशावेळी पंचायत समिती कार्यालयाकडून पाठ राखण केली जाते. ग्रामस्तरावरील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून सरपंच व उपसरपंच यांना अपमानास्पद वागणूक देणारे प्रशासक गटविकास अधिकारी यांच्याकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व विभागीय आयुक्त लक्ष देतील का ?, असा संतप्त सवाल सरपंच व उपसरपंच यांच्यामधून उपस्थित केला जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Your humor added a lot to this topic! For additional info, click here: FIND OUT MORE. What do you think?