माळशिरस पंचायत समिती मधील जम्बो अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होणार…
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस पंचायत समितीमधील जम्बो अधिकारी व कर्मचारी दि. 31 मे 2023 रोजी मोठ्या संख्येने सेवानिवृत्त होत आहेत.
त्यानिमित्त त्यांच्या सेवापुर्तीचा कार्यक्रम दि. 30 मे रोजी दुपारी ३ वा. माळशिरस पंचायत समिती माळशिरस येथे संपन्न होणार आहे. तरी उपस्थित रहावे, असे माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी आवाहन केले आहे.
माळशिरस पंचायत समितीमध्ये कार्यरत असणारे कृषी अधिकारी श्री. बी. एस. सूळ, विस्तार अधिकारी श्री. व्ही. बी. कोळेकर, श्री. के. व्ही. खरात, श्री. पी. बी. शिखरे, श्री. बी. डी. मुंडफणे, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. हर्षवर्धन नाचणे, वरिष्ठ सहाय्यक श्री. ए. बी. गायकवाड, ग्रामविकास अधिकारी श्री. सि. डी. कर्णे, हातपंप विभाग श्री. नारायण साठे असे प्रशासनातील जम्बो अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng