Uncategorizedताज्या बातम्या

माळशिरस-पिलीव रोड बनला मृत्यूचा सापळा… प्रशासन लक्ष देईल का ??

प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची जनतेची मागणी…

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस-पिलिव रोड मौजे तरंगफळ येथे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रस्ता होणार कधी ? असा सवाल संतप्त जनतेमधून उपस्थित होत आहे. माळशिरस तालुक्याचा दक्षिण भागातून सर्व शेतकरी वर्ग, विद्यार्थी या सर्वांना शासकीय कामासाठी किंवा शाळेसाठी माळशिरस या ठिकाणी यावे जावे लागते. सदर रोडवर शंकर सहकारी साखर कारखाना सदशिवनगर, ओंकार साखर कारखाना चांदापुरी, सहकार महर्षी साखर कारखाना अकलूज, दि सासवड माळी साखर कारखाना माळीनगर, पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपुर, श्री श्री साखर कारखाना राजेवाडी इ. कारखान्यांची वाहने या रोडवरून वाहत असतात. यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

माळशिरस-पिलीव रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक वेळा अपघात होतात. त्यात कित्येकजणांना अपंगत्व, कायमचं अपंगत्व येते. कित्येकजणांना यामुळे आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत. प्रशासन याची कधी दखल घेणार ? अपघातास जबाबदार कोण राहणार ? असे संतप्त सवाल जनतेमधून येत आहे.

त्यामुळे वेळीच प्रशासनाने लक्ष देवून सदरचा रस्ता दुरुस्त करावा अशी जनतेमधून मागणी होत आहे. याप्रसंगी नारायण तात्या तरंगे, माजी उपसरपंच सतीश कांबळे, प्रहार संघटना तालुका अध्यक्ष, तथा रत्नप्रभादेवी मोहिते पाटील दिव्यांग सेवा अध्यक्ष गोरख जानकर, राहूल मगर, हेमंत सातपुते, बालाजी नरळे, योगेश मोहिते, राजू कांबळे, ज्ञानदेव गोरड, कालिदास नरळे, कैलास बोडरे, काशिनाथ गेंड, शिक्षक वी. पा. धायगुडे सर, अनिल वाघमोडे, शांतीलाल शेंडगे, ऋषिकेश वाघमोडे, रामचंद्र माने आदींसह नागरिक उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button