युवानेते संकल्प डोळस यांनी आरोग्य मंत्री आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे मानले आभार…

दसुर (बारामती झटका)
युवा नेते संकल्प डोळस यांनी आरोग्य मंत्री ना. प्रकाशराव आबिटकर यांना दसुर प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कायमस्वरूपी सीएचओ मिळण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले यांनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कायमस्वरूपी डॉक्टर दिले. त्याबद्दल युवा नेते संकल्प डोळस यांनी आरोग्य मंत्री ना. प्रकाशराव आबिटकर यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले यांचेदेखील आभार मानले.
यावेळी डॉ. नवले म्हणाले की, जेव्हापासून आपण हे माझ्या निदर्शनास आणून दिले व मंत्री कार्यालयातून मला फ़ोन आला तेव्हापासून मी पर्मनंट डॉक्टर आपल्या तालुक्यातूनच शोधत होतो आणि ते मिळाल्याबरोबर आपणास सूचना केल्या“

कै. माजी आमदार हनुमंतराव डोळस यांच्या प्रयत्नाने जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य उपकेंद्र २०१७ साली दसुर गावात मंजूर करण्यात आले होते. तर २०१८ साली त्याचे भूमिपूजन संपन्न झाले. त्यानंतर २०२० साली त्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. मात्र, बरेच दिवस कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर डॉक्टरांची भरती नसल्याने त्याचबरोबर स्टाफची कमतरता असल्यामुळे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बंद होते.
युवा नेते संकल्प हनुमंतराव डोळस यांच्या प्रयत्नाने आरोग्य मंत्री ना. प्रकाशराव आबिटकर साहेबांना केलेल्या विनंतीला अनुसरून त्यांनी सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नलावडे यांना दिलेल्या आदेशानुसार काही दिवस तात्पुरते वेळापूरचे पीएसयुमधून आठवड्याला दोन किंवा तीन दिवसाला डॉक्टर उपलब्ध करण्यात आले. पण, कायमस्वरूपी बिएमएस डॉक्टर हा तालुक्यातला मिळावा, त्या अनुषंगाने बोरगाव येथील आज एक सीएचओ डॉक्टर या ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहेत. त्या सीएचओ डॉक्टरांची नियुक्ती झाल्यानंतर आरोग्य मंत्री ना. प्रकाशराव आबिटकर साहेबांचे आभार संकल्प डोळस यांनी मानले.संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात दोन मजली, दोन डॉक्टरांकरीता राहण्याची सोय असणारे, क्वार्टर असणारे हे दसुर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पहिलेच असेल, असे संशोधनातून आढळून आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



