माळशिरस येथील ५८ फाट्याला ज्यादा दाबाने पाणी सोडा – खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर
माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिरवंडी, कचरेवाडी, मेडद शेतकऱ्यांचे साकडे घातल्याने कार्यकारी अभियंता बोडके यांना खासदारांचे आदेश…
माळशिरस (बारामती झटका)
माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खा. रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांना माळशिरस तालुक्यातील ५८ फाट्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या तिरवंडी, कचरेवाडी, मेडद गावातील शेतकऱ्यांनी खासदारांना साकडे घातले. १० डिस्चार्ज पाणी सुरू आहे. त्यामुळे फाट्यावरील भरणे होत नाही. ५० डिस्चार्ज पाणी असल्यानंतर फाट्यावरील भरणे होत आहे. तरी जास्त दाबाने पाणी सोडण्याची कार्यकारी अभियंत्यांना आदेश द्यावेत, अशी विनंती केल्यानंतर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नीरा उजवा कालवा कार्यकारी अभियंता बोडके साहेब यांना दूरध्वनीवरून शेतकऱ्यांसमोर संपर्क करून जास्त दाबाने सोडण्याचे आदेश दिले. कार्यकारी अभियंता यांनी उद्या संध्याकाळपर्यंत ४० डिस्चार्ज पाणी सोडले जाईल, असे आश्वासन देण्यात आलेले असल्याने उपस्थित सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद तरळला होता.
पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उद्या सायंकाळपर्यंत पाणी कसल्याही परिस्थितीत आलेच पाहिजे नाहीतर शेतकऱ्यांना दरवाजा उघडण्याचे आदेश दिले जातील, असे सांगितल्यानंतर शेतकऱ्यांनी खासदार यांची कामाची पद्धत पाहून समाधान व्यक्त केले.
यावेळी निरा देवधर संघर्ष समितीचे अध्यक्ष व भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, कचरेवाडी तिरवंडी गावचे माजी पोलीस पाटील मारुती तेलंगे पाटील, ज्येष्ठ नेते सुरेश बबनराव लवटे, तिरवंडी गावचे लोकनियुक्त थेट जनतेतील सरपंच नानासाहेब वाघमोडे, उपसरपंच संजय माणिक वाघमोडे, सोसायटीचे संचालक कुंडलिक आबा वाघमोडे, तिरवंडीचे पोलीस पाटील शिवाजीराव शिंदे पाटील, लक्ष्मणराव सरक, बाबासो तुकाराम वाघमोडे, दत्तात्रेय वाघमोडे, बाळासो वाघमोडे, सतीश लोंढे तिरवंडी, बापूराव संभाजी वाघमोडे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र वाघमोडे, समाधान पाटील, दिलीप लक्ष्मण पाटील, बाहू ज्ञानदेव माने, विठ्ठल मारुती सर्जे, सोमनाथ अंकुश पाटील, दत्तात्रेय देवकते, पोपटराव झेंडे, माळशिरस युवा नेते रामभाऊ कचरे, कचरेवाडी रमेश सर्जे, बाळू सर्जे, विलास बाबासो वाघमोडे, ज्ञानदेव टेळे, सदाशिव काळे, विनोद थोरात, अजित थोरात, यांच्यासह तिरवंडी, कचरेवाडी, मेडद येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng