माळशिरस येथे अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासची मासिक मिटिंग
माळशिरस (बारामती झटका)
आज दि. 08/09/2022 रोजी माळशिरस येथे अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासची मासिक मिटिंग झाली. सदर मीटिंगला तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मीटिंगमध्ये मयताच्या वारस नोदी व रेशन दुकानच्या बाबतीत चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने रेशन दुकानदार ऑनलाइन पावती देत नाहीत, तसेच पावतीप्रमाणे रेशन धान्य नागरिकांना देत नाहीत. तसेच बऱ्याच नागरिकांची नावे ऑनलाईन मशीनमधून दिसून येत नाही. रेशन दुकानदार माळशिरस तहसील ऑफिसमध्ये पाठवीत असतात, नागरिकांना हेलपाटे मारण्याचा त्रास होत आहे. तसेच अन्य विषयावर चर्चा झाली. तसेच लागलीच रेशन दुकानदारांची बैठकीबाबत श्री. तहसीलदार माळशिरस यांना निवेदन दिले.
यावेळी जेष्ठ मार्गदर्शक व सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री. भीमराव फुले व माळशिरस तालुका अध्यक्ष पांडुरंग फुले, भगवान धाईंजे महादेव सावंत, बापुसो काळे पाटील विझोरी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. या बैठकीस श्री. शिवराम गायकवाड, श्री, दादासो भोसले, श्री. अजित कोडग साहेब, अकलूज शहर अध्यक्ष बाबासाहेब प्रदीप कारंडे, अकलूज शहर उपाध्यक्ष अयुब जहांगीर मुलाणी हे या बैठकीस उपस्थित होते.
बैठक संपल्यानंतर माळशिरस तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. तसेच अजित कोडग यांनी दसुर येथील गेली 2 ते 3 वर्ष बंद असलेले प्राथमिक आरोग्य उपकेंद्र विविध संघटनाच्या माध्यमातून आंदोलनं करुन उपकेंद्र तात्काळ चालू करून घेतले व यश संपादन केले याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng