Uncategorizedताज्या बातम्या

माळशिरस येथे चैतन्य डॉग केअर युनिट व पेट शॉपी चा उद्घाटन सोहळा

अनेक मान्यवरांच्या लक्षणीय उपस्थितीत चैतन्य डॉग केअर युनिट व पेट शॉपी चा उद्घाटन सोहळा होणार

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस येथे डॉ. हनुमंत रघुनाथ मगर यांच्या चैतन्य डॉग केअर युनिट व पेट शॉपी चा उद्घाटन समारंभ गुरुवार दि. ११/८/२०२२ रोजी सकाळी ११ वा. माळशिरस-म्हसवड रोड, गणेश कॉम्प्लेक्स, माळशिरस येथे अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे‌.

या उद्घाटन समारंभ प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य के. के. पाटील, माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख, भाजपा किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सरगर, निमगावचे उपसरपंच नंदकुमार पाटील, अकलूजचे पशुधन विकास अधिकारी डॉ. रावसाहेब पताळे, टेंभुर्णीचे कृषी पर्यवेक्षक जयवंतराव नलवडे, शिवामृत दूध संघाचे माजी संचालक हरिश्चंद्र मगर, अकलूज येथील श्री डॉग केअर युनिटचे डॉ. प्रकाश राजमाने, महाव्हेट सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉ‌. शहाजी ठवरे, अकलूज येथील मॉडर्न डॉग कॅट सेंटरचे डॉ. पोपट पवार आदी मान्यवर यावेळी प्रमुख उपस्थितीत असणार आहेत.

तरी या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन सौ. सुनीता हनुमंत मगर आणि श्री. डॉ. हनुमंत रघुनाथ मगर यांनी केले आहे. संपर्कासाठी मो. नं. ९८९०३२६७९४, ७७०९०८८५४३

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button