माळशिरस येथे मॅटर्नीटी अँड जनरल हॉस्पिटल आणि श्री डेंटल क्लिनिकचा सत्र न्यायाधीश कापुरे साहेब यांच्या शुभहस्ते शुभारंभ
डॉ. विजय वाघमोडे आणि डॉ. सौ. अश्विनी वाघमोडे यांच्या राधामाई मॅटर्नीटी अँड जनरल हॉस्पिटल व श्री डेंटल क्लिनिकचा थाटामाटात शुभारंभ संपन्न
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस येथे डॉ. विजय वाघमोडे आणि डॉ. सौ. अश्विनी वाघमोडे यांच्या राधामाई मॅटर्नीटी अँड जनरल हॉस्पिटल आणि श्री डेंटल क्लिनिकचा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश कापुरे साहेब यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी आमदार ॲड. रामहरी रुपनवर, माळशिरस तालुक्याचे जेष्ठ नेते ॲड. सुभाष पाटील, सहकार महर्षी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन ॲड. प्रकाशराव पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य ॲड. संजीवनीताई पाटील, ज्येष्ठ नेते गणपत तात्या वाघमोडे, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य उत्तमराव जानकर, माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्रआबा ठवरे पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य माळशिरस शहराचे संयमी नेतृत्व तुकारामभाऊ देशमुख, माळशिरस नगरपंचायतचे नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख, धुळदेव पतसंस्थेचे चेअरमन ॲड. दामोदर काळे, नातेपुते नगरपंचायतीचे नगरसेवक भानुदास राऊत, माळशिरस तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन खराडे, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती ॲड. विशाल पाटील, श्री श्री सद्गुरु साखर कारखाना राजेवाडीचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक माणिकराव जगताप, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर महादेवतात्या देशमुख, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य गौतमआबा माने, मल्लसम्राट कुस्ती संकुलाचे वस्ताद ॲड. आप्पासाहेब वाघमोडे, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष पांडुरंग वाघमोडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष सुरेशभाऊ टेळे, भांबुर्डीचे ज्येष्ठ नेते तानाजीराव शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य अनिल सावंत, निकमवाडी सोसायटीचे चेअरमन दादासाहेब माने, राष्ट्रवादी ओबीसीचे माजी तालुकाध्यक्ष सोमनाथ पिसे, पुरंदावडे गावचे माजी उपसरपंच पोपटराव गरगडे, सोसायटीचे सचिव मधुकर वाघमोडे, ॲड. एम. व्ही. कुलकर्णी, ॲड. धोपटे नोटरी, ॲड. खांडेकर, ॲड. कोळेकर म्हसवड, ॲड. व्ही.पी. घुले ॲड. शहाजी इंगवले देशमुख. ॲड. पि. ई. कुलकर्णी, ॲड. बी.वाय. राऊत आदी मान्यवरांसह माळशिरस तालुक्यातील वकिली क्षेत्रातील आजी-माजी पदाधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील सर्व मंडळी तसेच माळशिरस नगरपंचायतीचे अनेक नगरसेवक, आणि पंचक्रोशीतील व तालुक्यातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माळशिरस तालुक्यात सुप्रसिद्ध विधीतज्ञ ॲड. आर. एस. वाघमोडे यांचे चिरंजीव डॉ. विजय वाघमोडे आणि सुनबाई डॉ. सौ. अश्विनी वाघमोडे यांच्या राधामाई मॅटर्नीटी अँड जनरल हॉस्पिटल व डेंटल क्लिनिकचा शुभारंभ दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बुधवार दि. ५ ऑक्टोंबर २०२२ रोजी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटे या शुभमुहूर्तावर माळशिरस शहरात पुणे-पंढरपूर रोड येथे संपन्न झालेला आहे.
डॉ. विजय वाघमोडे यांचे प्राथमिक शिक्षण सरस्वती विद्यालय, मुंबई येथे झाले असून त्यांनी बी.डी.एस. लातूर येथील एम.आय.डी.एस.आर. डेंटल कॉलेज येथे पूर्ण केले आहे. तर पुणे येथील डी वाय पाटील कॉलेजमधून एम.डी.एस. पूर्ण केले आहे. डॉ. विजय वाघमोडे हे गेली ५ वर्षांपासून माळशिरस येथील श्री डेंटल क्लिनिक मध्ये कार्यरत होते. डॉ. अश्विनी वाघमोडे यांचे प्राथमिक शिक्षण वर्धमान विद्यालय, वालचंदनगर येथे झाले असून बी.ए.एम.एस. सातारा येथील आर्या गर्ल मेडिकल कॉलेजमध्ये पूर्ण केले आहे. तर एम एस (स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ) अश्विन रुरल मेडिकल कॉलेज मांचीहिल संगमनेर येथे पूर्ण केले आहे.
माळशिरस शहरांमध्ये प्रथमच सुसज्ज इमारत व अद्यावत मशिनरीचा दवाखाना सुरू झालेला आहे रुग्णांसाठी वेगवेगळ्या रूमची व्यवस्था केलेली आहे पेशंटच्या नातेवाईकांना मुक्कामाच्या वेळी अडचण होऊ नये याचीही दक्षता घेतलेली आहे. सदरची सुसज्ज अशी इमारत उभी करण्यात तरंगफळचे माजी उपसरपंच इंजिनिअर अविनाश तरंगे यांचा सिंहाचा वाटा आहे.
यावेळी डॉ. सौ. अश्विनी वाघमोडे यांनी आभार व्यक्त करताना सांगितले कि, आम्हाला रुग्णाची सेवा करण्याचे भाग्य लाभले. रुग्ण सेवा करून आम्ही त्या संधीचे सोने करू. सर्वांच्या आशीर्वादामुळे हे सगळ शक्य झाले आहे, असे म्हणून त्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. भारत गोगावले यांनी केले. यावेळी डॉ. गणेश वाघमोडे, डॉ. दिलीप वाघमोडे, डॉ. महादेव वाघमोडे, डॉ. सुनील नरुटे, डॉ. मोहन वाघमोडे, डॉ. संजय गायकवाड, डॉ. रवींद्र काळे, डॉ. समीर बंडगर यांच्यासह अनेक मान्यवरांनी दवाखान्याच्या शुभारंभ प्रसंगी व शुभारंभ नंतर भेटी देऊन डॉक्टर वाघमोडे दाम्पत्य यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
I enjoyed the humor in your piece! For further reading, check out: FIND OUT MORE. Let’s discuss!