Uncategorized

माळशिरस येथे मे. यादव पेट्रोलियमचा भव्य शुभारंभ थाटात संपन्न झाला.

मातृ पितृ देवो भव या न्यायाने दैवत असणारे आई सौ जय प्रभादेवी यादव वडील श्री ज्ञानेश्वर यादव यांच्या शुभहस्ते शुभारंभ झाला.

माळशिरस ( बारामती झटका )

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर माळशिरस नगरपंचायत हद्दीत हिन्दुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे मे. यादव पेट्रोलियमचा दीपावलीच्या शुभमुहूर्तावर मातृ-पितृ देव भव या नात्याने आई वडील दैवत असणारे आई सौ जयप्रभा देवी ज्ञानेश्वर यादव व वडील श्री ज्ञानेश्वर बाबाजी यादव या अभय दंपत्यांच्या शुभ हस्ते सुरू करण्यात आला आहे.


देहू-आळंदी-पुणे-पंढरपूर या रस्त्यावर नेहमी भाविकांची वर्दळ असते. माळशिरस तालुक्यात दोन चाकी मोटरसायकल, तीन चाकी रिक्षा, चार चाकी गाड्या, ऊस वाहतूक करणारी वाहने, शेतीची मशागत करणारे ट्रॅक्टर, हार्वेस्टर, मालवाहतूक, तरकारी पालेभाज्या, डाळिंब, केळी अशी अनेक वाहने दिवसेंदिवस वाढत आहेत. माळशिरस नगरपंचायत हद्दीत जुना पालखी मार्ग व नवीन महामार्गाचा बायपास केलेल्या दोन्ही रस्त्याच्या कडेला तालुक्यातील व पुणे पंढरपूर रोडवरील ग्राहकांना सोयीचे व्हावे यासाठी डिझेल, पेट्रोल पंप सुरू करून हवा भरणे थंड पाण्याची सोय केलेली आहे.


थोड्याच दिवसानंतर या पेट्रोल पंपावर सीएनजी गॅस व चार्जिंगवरील वाहनांसाठी चार्जिंगची सुविधा उपलब्ध करणार आहोत. लवकरच आपल्या सेवेसाठी मे. यादव पेट्रोलियम सुरु करीत आहोत, आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा असल्याचे युवा उद्योजक श्री. अमोल ज्ञानेश्वर यादव यांनी सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button