माळशिरस येथे संत नामदेव महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत
माळशिरस (बारामती झटका)
श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान (पंजाब) या दरम्यान कार्तिक एकादशी आणि संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५२ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून यावर्षी प्रथमच काढण्यात आलेली पालखी रतनी सायकल यात्रेचे स्वागत मारुती मंदिर माळशिरस येथे करण्यात आले.

त्यावेळी कीर्तनकार, प्रवचनकार, भजनी मंडळी, स्त्री पुरुष भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उत्साहात सहभागी झाले होते. या यात्रेत सुमारे ११० सायकल यात्री सहभागी झाले आहेत. या यात्रेचे नियोजन सूर्यकांत भाऊ भिसे यांनी केलेले आहे. दरम्यान माळशिरस येथे चहा आणि नाष्ट्याचे आयोजन केले होते. यावेळी नामदेव शिंपी समाज बांधव उपस्थित होते. श्री. दिनेश पोरे, श्री. प्रमोद डोंगरे, श्री. अशोक भोंगाळे, श्री. प्रशांत पोरे, श्री. सागर ढवळे, श्री. भोजराज पोरे, श्री. प्रभाकर पोरे, श्री. अक्षय जवंजाळ, श्री. विलास पोरे, श्री. रमेश जवंजाळ, श्री. भारत जंजाळ, श्री. योगेश पोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
