माळशिरस येथे स्पर्धा विश्व अभ्यासिकेचा सहावा वर्धापन दिन उत्साहात साजरा
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस येथे दि. ७ एप्रिल २०२३ रोजी “स्पर्धा विश्व अभ्यासिकेचा” सहावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संतोष सोनवणे साहेब (असिस्टंट जनरल मॅनेजर, बँक ऑफ इंडिया, अकलूज शाखा ) आणि कु. संगीता ढोले मॅडम (संचालिका, सावी सामाजिक बहुउददेशीय संस्था, वाशीम ) हे होते. तर प्रमुख उपस्थितीत विनायक शिंदे ( संचालक, स्पर्धा विश्व अभ्यासिका, माळशिरस ), नितीन फासे साहेब (असिस्टंट मॅनेजर, बँक ऑफ इंडिया शाखा अकलूज), पै. शिवांजली भारत शिंदे (महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ब्रांझ पदक), समीर सरगर सर (इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर राज्यात चौथा), दिनेश भोसले सर, सदाशिवराव पवार साहेब, प्रा. नानासाहेब वाघमोडे सर, मधुकर वाघमोडे साहेब, हनुमंत सूर्यवंशी साहेब, बाळासाहेब काटे साहेब, पुष्पा काळे मॅडम (तलाठी), गणेश बाबर साहेब, माधुरी मॅडम, नवनाथ हांगे, महादेव जंगले आदी मान्यवर होते.
यावेळी अभ्यासिकेचे संचालक विनायक शिंदे सरांनी अभ्यासिकेविषयी यशस्वी निकाल व आतापर्यंत प्रवास बदललांची माहिती दिली. अभ्यासिकेची निर्मिती दि. २७ मार्च २०१७ रोजी झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश महानवर यांनी केले. अभ्यासिकेतील समीर सरगर सर MPSC मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर या पदी त्यांची निवड होवून राज्यात चौथा क्रमांकाने निवड झाल्याबद्दल अभ्यासिकेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धा विश्व अभ्यासिका ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे ते सदाशिवराव पवार साहेब (निवृत्त कृषी अधिकारी) यांचा सोनवणे साहेब यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी पैलवान शिवांजली भारत शिंदे हिने महाराष्ट्र केसरी २०२३ कुस्ती स्पर्धेमध्ये ब्रांझ पदक मिळवल्याबद्दल अभ्यासिकेच्या वतीने सन्मानचिन्ह व सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी अभ्यासिकेतील इतर यशस्वी विद्यार्थी यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी समीर सरगर सर यांनी संयुक्त पूर्व परीक्षा व राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अमूल्य अशी माहिती सांगितली. अभ्यासिकेमध्ये २०२० पासून संयुक्त पूर्व परीक्षा पास होणाऱ्या फी मध्ये ५०% सवलत दिली जाते व राज्यसेवा पूर्व परीक्षा पास होणाऱ्या अभ्यासिका मोफत उपलब्ध करून दिले जाते. याबरोबरच यावर्षीपासून अनाथ मुले यांना मोफत अभ्यासिका व अपंग यांना ५०% फ्री मध्ये सवलत देण्यात येत आहे. अशी सोय असणारी ही एकमेव अभ्यासिका आहे. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन धर्मराज गोरड यांनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng