माळशिरस येथे स्व. शिवाजीराव वावरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त १०१ सायकल व २५ हजार शैक्षणिक वह्यांचे वाटप
प्रतिष्ठित बागायतदार स्व. शिवाजीराव सोपान वावरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस येथील प्रतिष्ठित बागायतदार स्व. शिवाजीराव सोपान वावरे यांच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्त रविवार दि. ९ ऑक्टोंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वा. १०१ सायकल व २५ हजार वह्यांचे गरजू विदयार्थांना वाटप केले जाणार आहे, अशी माहिती उद्योजक सचिन वावरे यांनी दिली.
सदर कार्यक्रम सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, माजी आमदार ॲड. रामहरी रुपनवर व तालुक्याचे नेते उत्तमराव जानकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी व कक्ष प्रमुख मंगेश चिवटे असणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख, उपनगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख, डीवायएसपी धुळदेव टेळे, मुख्याधिकारी नितीन गाढवे, माजी सरपंच तुकाराम देशमुख, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हा .चेअरमन ॲड. मिलिंद कुलकर्णी, जि.प. अध्यक्ष हनुमंतराव बंडगर, ज्येष्ठ नेत्या संजीवनी पाटील, माजी सरपंच माणिक बापू वाघमोडे, उद्योजक रवींद्र फरांदे, पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, अरुण सुगावकर, माजी उपनगराध्यक्ष डॉ. मारुतराव पाटील, श्री श्री सदगुरु साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, रामदास काळे, सुनील जाधव, पांडुरंग वाघमोडे, विकास धाईंजे, अभियंता प्रवीण कुंभारे, अभियंता संतोष रजपूत यांची उपस्थिती असणार आहे.
त्याचबरोबर माळशिरस नगरपंचायतचे नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. स्व. शिवाजीराव वावरे हे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाटचाल करून यशस्वी झाले. ते सदैव सामाजिक उपक्रमामध्ये सक्रिय होत असत, त्यामुळे सचिन वावरे हे गेली आठ वर्ष सातत्य ठेवून सामाजिक उपक्रम राबवत आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng