मोरोची मधील अवैध धंदे बंद व्हावेत, दलित महासंघ महिला आघाडीच्या तालुका उपाध्यक्षा बायडाबाई खिलारे यांची मागणी

माळशिरस (बारामती झटका)
मोरोची ता. माळशिरस या गावातील बेकायदेशीर हातभट्टी व इतर दारू धंदे बंद करण्याबाबतचे निवेदन दलित महासंघ महिला आघाडीच्या तालुका उपाध्यक्षा सौ. बायडाबाई दत्तू खिलारे यांनी पोलीस निरीक्षक नातेपुते पोलीस स्टेशन यांना दिले आहे. सदर निवेदन देताना दलित महासंघाचे तालुका अध्यक्ष संपत लक्ष्मण खिलारे उपस्थित होते.
सदर निवेदनात असे नमुद करण्यात आले आहे की, राजकीय पुढारी ग्रामपंचायत, सदस्य यांचे समर्थक, कार्यकर्ते कर्चे-डोंबारी गल्ली, जाधव-साठेनगर, आवटे-साठेनगर, झेंडे-साठेनगर, प्रेमाताई झेंडे यांचे दारू धंदे असून दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत व अनेकांनी या अभावी अपघाताला सामोरे जावे लागले आहे लागत आहे. सदरचे धंदे बेकायदेशीर असून त्याला ग्रामपंचायत सदस्य आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वरदहस्त आहे. दारू धंदे बंद करा म्हणून काही महिला ग्रामपंचायत सदस्य अधिकारी यांच्याकडे गेले असता त्या महिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन घाणेरड्या जातीवाचक शब्दात शिवीगाळ केलेले आहे. सदरच्या दारू धंद्यामुळे चांगले संसार उध्वस्त होत आहेत व जाणीवपूर्वक या धंद्यावर दुर्लक्ष होत आहे.

तरी सदरचे धंदे बंद न केल्यास दलित महासंघ व बहुजन समता पार्टी दि. १/१/२०२४ पासून पोलीस स्टेशन नातेपुते येथे आंदोलनास बसणार आहेत. तरी या निवेदनाची दखल घेऊन या लोकांवरती तातडीने कार्यवाही करावी अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.
सदर निवेदनाच्या प्रती माहिती अधीक्षक दारूबंदी विभाग सोलापूर, पोलीस निरीक्षक साहेब सोलापूर ग्रामीण, डी वाय एस पी साहेब अकलूज, प्रांत अधिकारी साहेब माळशिरस विभाग यांना देण्यात आल्या आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.