माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची नव्याने पाणीदार आमदार म्हणून ओळख होणार…
कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्याकडे माळशिरस तालुक्यातील प्रलंबित २२ गावांना नीरा देवधरचे हक्काचे पाणी मिळावे व इतर गावातील साखळी बंधारे व कोल्हापूर पद्धतीचे बंधाऱ्यासाठी निधी मिळण्यासाठी केली मागणी
माळशिरस ( बारामती झटका )
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या संकल्पनेत असलेल्या निरा देवधर धरणातील हक्काचे पाणी माळशिरस तालुक्यातील कायम दुष्काळी असणाऱ्या २२ गावांना मिळावे, यासाठी प्रलंबित असणारी २२ गावांच्या जिव्हाळ्याची योजना कार्यान्वित करावी व माळशिरस तालुक्यातील मौजे बांगर्डे येथे नीरा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधकाम करणे, मौजे भांब लोणंद व फडतरी नाल्यावरती साखळी बंधारे बांधकाम करणे, मौजे जाधववाडी, पुरंदावडे, येळीव, मेडद व तिरवंडी नाल्यावरती साखळी बंधारे बांधकाम करणे, मौजे दहिगाव, डोंबाळवाडी नाल्यावरती साखळी बंधारे बांधकाम करणे, मौजे शेंडेचिंच स्थानिक नाल्यावरती साखळी बंधारे बांधकाम करणे अशा मागण्यांचे पत्र आमदार राम सातपुते यांनी कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांना देण्यात आले.
त्यावेळेस अधिकाऱ्यांना तात्काळ बोलावून निरा देवधर योजना कार्यान्वित करण्याचे आदेश देऊन बंधाऱ्यासाठी निधीची तरतूद करण्याचे जलसंपदा विभागाला आदेश दिलेले आहेत. त्यामुळे माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची नव्याने पाणीदार आमदार म्हणून ओळख होणार आहे.
तालुक्याच्या कायम दुष्काळी भागाचा प्रश्न लोकप्रिय आमदार राम सातपुते यांनी रखडलेल्या प्रश्नाला उर्जित अवस्था आणलेली असल्याने माळशिरस तालुक्यात आमदार राम सातपुते यांच्या विषयी समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे सदरची योजना मंजूर झालेली होती. मात्र, विजयदादांच्या मागणीला सरकारमधील लोकप्रतिनिधी यांचा म्हणावा असा सकारात्मक दृष्टिकोन नव्हता. त्यामुळे सदरची योजना रेंगाळलेली होती. गेल्या पाच वर्षांमध्ये युतीचे सरकार असताना देवेंद्रजी फडवणीस मुख्यमंत्री होते, त्यावेळेस सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनीही पाठपुरावा केलेला होता. दरम्यानच्या काळामध्ये महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्ष होते, त्या कालावधीत काहीच झाले नाही.
सध्या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे व देवेंद्रजी फडवणीस यांचे सरकार आहे. माळशिरस विधानसभेचे लोकप्रतिनिधी आमदार राम सातपुते भाजपचे आहे. केंद्रात भाजपचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत, त्यामुळे माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी रखडलेली निरा देवधर योजनेतील २२ गावांचा जिव्हाळ्याचा प्रश्न व इतर तालुक्यातील साखळी बंधारे व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे यासाठी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्याकडे योजना कार्यान्वित करून अन्य कामांसाठी निधी द्यावा अशी मागणी केलेली आहे.
लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी तालुक्यातील पाण्याच्या प्रश्नाबरोबर दळणवळण व शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने साखळी बंधारे व कोल्हापूर पद्धतीचे बंधाऱ्याची मागणी केलेली आहे. मोजे बांगर्डे ता. माळशिरस येथील नीरा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा तयार केल्यानंतर माळशिरस तालुक्यातील बांगर्डे व इंदापूर तालुक्यातील निमसाखर या दोन आंतरजिल्हा गावांना जोडणारा फुल होण्याची अत्यंत आवश्यकता भासत आहे. कारण २५ किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे. नातेपुते ते इंदापूर हा पालखी मार्ग जोडला जाईल. नागरिकांची दवाखाना व शाळा यांचे अंतर जे होडीने धोकादायक प्रवास करून प्राण मुठीमध्ये धरून करावा लागतो, ती अडचण दूर होईल. कामगार, शेतकरी यांना नदीपार करताना होणारे हालअपेष्टा कमी होतील व वेळेची बचत होईल. इंदापूर वालचंदनगर बाजारपेठ जोडली जाईल, होडीतून शाळेसाठी जी मुले जीवघेणा प्रवास करतात त्यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे.
अशा पाण्याबरोबर लोकहिताच्या असणाऱ्या नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधकाम करण्याची मागणीसह अनेक मागण्या देवेंद्रजी फडवणीस यांनी मान्य करून लवकरच कार्यान्वित होतील. माळशिरस तालुक्यातील अनेक शेतकरी, कामगार, विद्यार्थी यांचा दळणवळणाचा प्रश्न मिटून कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याने सामान्य जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे. त्यामुळे माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची नव्याने पाणीदार आमदार म्हणून ओळख होणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Great read with a touch of humor! For further details, check out: READ MORE. What are your thoughts?