नातेपुते येथे शंभू महादेव भंडाऱ्यानिमित्त कुस्त्यांचे मैदान

नातेपुते (बारामती झटका)
श्री शंभू महादेव श्रावणी भंडारा उत्सवानिमित्त श्रावणी सोमवार दि. २६ ऑगस्ट रोजी नातेपुते येथील श्री शंभू महादेव आखाडा येथे नातेपुते ग्रामस्थांच्या वतीने निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केले असल्याची माहिती कुस्ती मैदानाचे अध्यक्ष आप्पासाहेब भांड यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपस्थितांच्या हस्ते कार्यक्रम पत्रिकेचे अनावरण करून कुस्ती शौकीनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन करण्यात आले.
सोमवारी आखाड्याचे उद्घाटन पै. रोहन दडस, नातेपुते वि पै. निखिल माने सांगली यांच्या कुस्तीने करण्यात येणार आहे. इनामी कुस्त्यांमध्ये इनाम १ लाख ५१ हजार पै. प्रकाश बनकर, कोल्हापूर वि पै. माऊली कोकाटे, पुणे, १ लाख २१ हजार पै. दादा शेळके, पुणे वि पै. संदीप मोटे, सांगली, १ लाख पै. वैभव माने, पुणे वि पै. महारुद्र काळे, कुर्डुवाडी, ७५ हजार पै. आदर्श सोरटे, नातेपुते वि पै. अभिजीत भोईर, पुणे, पै. संग्राम साळुंखे, सदाशिवनगर वि पै. उमेश चव्हाण, कोल्हापूर, ५० हजार पै. समीर शेख, पुणे वि पै. राहुल सुळ, पुणे, पै. बाळू बोडके, पुणे वि पै. जमीर मुलाणी, फोंडशिरस, पै. शुभम माने, पुणे वि पै. विक्रम घोरपडे, अकलूज, २५ हजार पै.,प्रमोद सुळ, नातेपुते वि पै. लखन राजमाने, गारअकोले, पै. धुळदेव पांढरे, नातेपुते वि पै. किरण जाधव, कोल्हापूर तसेच अन्य पै. प्रसाद पांढरे, सांगली वि पै. कुणाल बोडरे, निमगाव, पै. प्रकाश पांढरे, नातेपुते वि पै. ओंकार बुधावले, लोणंद, पै. रोहित निटवे, नातेपुते वि पै. कृष्णा पाटील, सांगली, पै. यश काळे, नातेपुते वि पै. सतीश यमगर, निमगाव, पै. विकी करे, नातेपुते वि पै. किरण भुई, आसू, पै. उमर नदाफ, नातेपुते वि पै. रणजीत माने, दहिवडी, पै. सोहेल शेख, कोल्हापूर वि पै. सौरभ शिंगाडे, पुणे, पै.पप्पू शेंडगे, नातेपुते वि पै. रणजीत बोडरे, फोंडशिरस यांच्या इनामी लढती होणार असल्याचे सांगितले.
पत्रकार परिषदेस बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे, उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, बाळासाहेब काळे, उद्योगपती अतुल बावकर, नंदू लांडगे, निजाम काझी, नारायण काळे, रणजीत काळे, शक्ती पलंगे, देविदास काळे, हनुमंत सरक, सुधीर सोरटे, बबन अर्जुन, सुखदेव दडस, संजय पांढरे, रोहित शेटे, सुचित साळवे, सुरज कुचेकर उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.