मावळ तालुक्यातील सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या शेती अभ्यास दौऱ्यानिमित्त घडले शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाचे दर्शन.
धर्मराज ठोंबरे यांनी प्रतिकूल परिस्थितीत काळाची पाऊले ओळखून कुटुंबाचे आर्थिक नियोजन करून प्रगती साधली – सहकार महर्षी माऊलीभाऊ दाभाडे
पिरळे ( बारामती झटका )
पुणे जिल्ह्याचे नेते, सहकार महर्षी, पुणे जिल्हा बँकेचे संचालक, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्री. माऊलीभाऊ दाभाडे (मा. अध्यक्ष व विद्यमान संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुणे) साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुक्यातील निवडक कार्यकर्त्यांसह शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाचे दर्शन व तेथून प्रगतशील शेतकरी धर्मराज नामदेव ठोंबरे पाटील (मा. सरपंच) यांच्या पिरळे, कुरबावी व नातेपुते येथील ऊस, डाळिंब व गाई गोठा पाहणी अभ्यास दौरा करण्यात आला.
यावेळी बबनराव भोंगाडे मा. सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मावळ, बाळासाहेब गायकवाड संचालक संत तुकाराम सहकारी साखर कारखाना मावळ, विलास मालपोहे अध्यक्ष युवक काँग्रेस मावळ, गणपत भानुसहारे अध्यक्ष मावळ तालुका सचिव संघटना, दत्तात्रय आंद्रे चेअरमन खंडकाळा वि. का. सोसायटी, संजय ढोरे सचिव मावळ ता. दे. दे संघ, भाऊसाहेब बांगर चेअरमन सांगिसे वि. का. सोसायटी, खंडूशेठ जाधव मा. सरपंच संचालक मावळ ता. ख. पि. संघ, भाऊसाहेब दाभणे उपसरपंच कांब्रे, भाऊसाहेब मोरमारे सरपंच पाले, किसन आहेर मा. अध्यक्ष मावळ देखरेख संघ, संतोष कोंढरे मा. सरपंच, विष्णू मावकर, भाऊसाहेब लालगुडे चेअरमन चिखलसे वि. का. सोसा., दत्तात्रय चोपडे मा. चेअरमन चिखलसे वि.का. सोसा., संभाजी शिंदे मा. चेअरमन चिखलसे वि.का. सोसा., चंद्रकांत चोपडे मा. चेअरमन चिखलसे वि.का. सोसा., शिवराम चोपडे मा. चेअरमन चिखलसे वि.का. सोसा., रामचंद्र येवले चेअरमन कार्ला वि.का.सोसा., पांडुरंग मावकर मा. सरपंच, पांडुरंग भानुसघरे संचालक कार्ला वि. का. सोसा., सोमनाथ अस्वले ग्रामपंचायत सदस्य, हरिदास कडू संचालक, मधुकर कोकाटे आदिवासी नेते मावळ, बबनराव मराठे नेते, मारुती ढवळे मा. सरपंच, निवृत्ती टाकळकर, भाऊसाहेब शिरसट तसेच मावळ तालुक्यातील सचिव मित्रपरिवार धनंजय विधाटे, मदन अहिवळे, अंकुश टाकळकर, सोमनाथ गायकवाड, संभाजी केदारी, भरत साठे, प्रशांत ढोरे आदी उपस्थित होते.
शंभू महादेवाचे दर्शन करून सर्व मान्यवर नातेपुते जवळील पिरळे येथील प्रगतशील शेतकरी धर्मराज नामदेव ठोंबरे पाटील, मा. सरपंच यांच्या मातोश्री फार्म हाऊसवर गेले. यावेळी धर्मराज ठोंबरे आणि त्यांच्या परिवाराने सर्वांचे वाजत गाजत स्वागत करून गुलाब पुष्प व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी मावळ तालुक्याचे सहकार महर्षी माऊलीभाऊंनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी मार्गदर्शन करताना असे सांगितले की, शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, कृषी पर्यटन करून शेतकऱ्यांनी आपले व कुटुंबाचे जीवनमान उंचावले पाहिजे. ठोंबरे पाटील परिवाराने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कष्ट करून शेती व्यवसायात नाविन्यपूर्ण प्रयोग करून बागायती शेती डाळिंब, शेती, दुग्ध व्यवसाय उत्तम प्रकारे करून कुटुंबातील मुलांना उच्च शिक्षण देऊन आयटी क्षेत्रात बँकिंग क्षेत्रात कार्य करावे. त्यावेळी धर्मराज ठोंबरे पाटील यांनी काळाची पावले ओळखत उत्तम प्रकारे कुटुंबाचे आर्थिक नियोजन करून प्रगती साधली. एक आदर्श असे कुटुंब उभा केले. यांचा सर्वांनी आदर्श घ्यावा, असे आव्हान माऊलीभाऊंनी केले तर धर्मराज ठोंबरे पाटील परिवाराने जे आदरातिथ्य केले याबद्दल त्यांचे आभार मानले व पुढील कार्यास मावळवासियांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
यावेळी माळशिरस तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य उत्तमराव जानकर, पंचायत समिती सदस्य गौतम बाबा माने पाटील, ज्ञानराज उर्फ माऊली पाटील, मानसिंग मोहिते, अजय सकट, फडतरीचे उपसरपंच प्राध्यापक दुर्योधन पाटील, फडतरी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन अर्जुनदादा रुपनवर, माजी उपसरपंच आप्पा रुपनवर, बापूराव पाटील सेक्रेटरी, पांडुरंग रुपनवर विकास सेवा सोसायटी सदस्य, यशवंत सोरटे विकास सेवा सोसायटी सदस्य, विठ्ठलशेठ महानवर, संतोष दडस, शिवाजी लवटे माजी सरपंच पिरळे, आनंदा निटवे माजी ग्रामपंचायत सदस्य, फडतरी हिराआप्पा निटवे, खाशाबा ठोंबरे विकास सेवा सोसायटी सदस्य, कन्हेरचे बाजीराव माने, नामदेव पाटील, बापू कचरे, धर्मा माने, राजाभाऊ माने, दादासाहेब घाडगे, निवृत्ती भुसारे वस्ताद, कुस्ती निवेदक शेंडगे सर आदींसह माळशिरस तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng