मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण प्रकल्प (स्मार्ट) भाग – २ सतिश कचरे म.कृ.अ.
नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते या योजनेच्या लेख भाग – १ मध्ये आपण प्रकल्प, कालावधी, लाभार्थी, प्रकल्पातील बाब, पात्रता, प्रकल्पाचे घटक या बाबीविषयी सविस्तर माहिती घेतली. लेख भाग क्र. २ मध्ये खालील बाबीवर विवेचना करूया.
१ – प्रकल्पामध्ये कोण भाग घेऊ शकते – सामुदाय अधारित संस्थामध्ये, शेतकरी उत्पादक कंपनी, त्याचे फेडरेशन, प्रभाग संघ, माविमा अंतर्गत लोकसंचलीत साधना केंद्र, आत्मा नोंदणी गट, नोंदणीकृत शेतकरी गट निवडीचे निकष :- १ – संस्था कायदेशीर नोंदणी प्रमाणपत्र असावे. २ – सनदी लेखापालद्वारे लेखा परिक्षण केलेले असावे. ३. शेतकरी उत्पादक कंपनीत २५० भागधारक व नोंदणी केलेली (Roc) असावी. ४ – लोकसंचलीत साधन केंद्र व प्रभाग संघ यांचे किमान १०० बचत गट सदस्य असणे आवश्यक आहे. ५ – फेडरेशनसाठी १० संस्थापक सदस्य व आत्मा नोंदणीकृत गटांमधील २० सदस्य असावेत. ६ – संस्थेच्या लेखापरिक्षण अहवालामध्ये लक्षणीय लेखापरिक्षण आक्षेप नसावेत. ७ – संस्था कोणत्याही प्रकारच्या कर्जाची थकबाकीदार नसावी. ८ – मागील ३ वर्षापैकी एका वर्षात ५ लाख पेक्षा जास्त सनदी उलाढाल व लेखापरिक्षण अहवाल असावा. वरील निवडीचे निकष अनिवार्य राहतील.

निवडीसाठी खालीलप्रमाणे प्राधान्य क्रम लावण्यात येतात. १ – संस्था कंपनीमध्ये मागील वर्षामध्ये सभासद वाढ आहे. २ – खरेदीदार व संस्था कंपनी सामंजस्य करार आहे. ३ – सामुहीक खरेदी व विक्री अनुभव आहे. ४ – संस्था गट कंपनी स्वतःचे नावे ७/१२ पहिजे व नसेल तर ३० वर्षाचा दुय्यम निबंधक नोंदणी भाडे करार असावा. ५ – संस्था कंपनी गट यांनी २५% नफा भागधारकांना लाभांश देण्यात आलेला आहे. ६ – ज्या संस्थात ८०% अल्प व अत्यल्प सदस्य, ६% अनुसुचित जाती सदस्य, ७% अनुसुचीत जमाती व ३०% महीला शेतकरी सदस्य असावेत. ७ – उत्पादक भागीदारी उपप्रकल्पांसाठी खरेदीदाराच निवडीचे निकष – कायेदीशीर नोंदणी कृत संस्था व ५० लाख व्यावसायिक उलाढाल असावी.
स्मार्ट प्रकल्पात समाविष्ठ बाबी – दूध, दूध संबंधी प्रक्रिया, ऊस व संबंधीत साखर गुळ प्रक्रिया वगळता यामध्ये सर्व बाबीचा समावेश आहे. स्मार्ट प्रकल्प अनुदान – तांत्रिक दृष्ट्या योग्य व वितीय दृष्ट्या व्यवहार्य नसतील त्यांना VGR व्यवहार्यता अंतर निधी व अनुदान मर्यादा जास्तीत जास्त ६०% असेल व उर्वरीत रककम संस्था यांनी स्वभांडवल स्वरुपात उभा करावयाची आहे. तरी आपली संस्था कंपनी, आत्मा गट प्रभाग संघ, सामुहीक लोकसंचलीत साधना केंद्र, यांनी मंडळ कृषि अधिकारी नातेपुते मा. तालुका कृषि अधिकारी माळशिरस व मा. प्रकल्प संचालक आत्मा सोलापूर यांचेशी संपर्क करून अधिक माहिती, मार्गदर्शन सल्ला घेणेबाबत आपणास प्रथम प्राधान्यक्रमाने स्वागत व आमंत्रीत करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng