मिलिंद सरतापे यांनी माळशिरस तालुक्यातील रिपब्लिकन पक्ष उभारणीसाठी कंबर कसली
श्रीपूर (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांचे मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुका नुतन अध्यक्ष मिलिंद सरतापे यांनी माळशिरस तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्त्यांची एकजुटीची मोट बांधण्याचे प्रामाणिक प्रयत्न सुरू केले आहेत.
तालुक्यातील पक्ष गावागावात शहरात, खेड्यात, वस्त्यावाडयांवर पोहोचवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला जोडण्यासाठी मिलिंद सरतापे अहोरात्र मेहनत घेऊन पक्ष उभारणीसाठी कंबर कसून ते झटत असल्याने कार्यकर्त्यांनी त्यांना साथ देत असल्याचे सकारात्मक चित्र पहायला मिळत आहे. कार्यकर्त्यांचे मोठं जाळं तयार करून त्यांना माळशिरस तालुका अध्यक्ष पद दिल्याचे ते आपल्या कार्यातून दाखवून देत आहेत.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत रिपब्लिकन पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी आतापासूनच कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे धोरण भुमिका कार्य केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पुढे आले पाहिजे, या विचाराने सरतापे यांनी आपले अध्यक्ष पद पणाला लावून सामाजिक वैचारिक मंथन सुरू केले आहे. सोलापूर जिल्हा रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला राजाभाऊ सरवदे यांनी पहिल्यापासून शाबूत ठेवला आहे. त्याच धर्तीवर माळशिरस तालुका रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला कायम अबाधित ठेवण्यासाठी तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे हे सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन लढत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.
काही ग्रामीण भागातील पक्ष कार्यकर्ते एरवी रिपब्लिकन पक्षाचे म्हणून वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस मिरवत असतात. मानमरातब घेत असतात, पद स्विकारत असतात. पण पंचवार्षिक निवडणूक आल्या की स्थानिक प्रस्थापित नेत्यांच्या दावणीला जातात, हे थांबवण्यासाठी व पक्षाचे धोरण भुमिका, विचार जे तंतोतंत पाळतात, अशा एकनिष्ठ प्रामाणिक पक्षाचे कार्यकर्त्यांना निवडणुकीत व पक्ष कार्यकारिणीमध्ये प्रथम स्थान दिलं जाईल व त्यांचाच पक्ष विचार करेल, ही भुमिका, विचार सरतापे पुढं घेऊन वाटचाल करताना दिसत आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Great mix of humor and insight! For more, click here: READ MORE. Let’s discuss!