मुंबई मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अवर सचिव गणेश कचरे यांनी माळशिरस विधानसभेचे आ. राम सातपुते यांची सांत्वनपर भेट घेतली.
मांडवे (बारामती झटका)
मुंबई मंत्रालयातील महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अवर सचिव गणेश कचरे यांनी माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार राम सातपुते यांची माळशिरस तालुक्यातील मांडवे 50 फाटा येथील श्रीराम निवासस्थान येथे शनिवार दि. 01 जुलै 2023 रोजी दुपारी सांत्वनपर भेट घेतली.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार यांच्या मातोश्री स्वर्गीय सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांचे सोमवार दि. 26/06/2023 रोजी वयाच्या 74 व्या वर्षी दुःखद निधन झालेले होते. त्यांच्यावर मूळगावी डोईठाण, ता. आष्टी, जि. बीड, येथे अंतिम संस्कार करण्यात आलेले होते. सर्व विधी, क्रियाकर्म करून शुक्रवार दि. 30/06/2023 पासून सर्वांना भेटीसाठी माळशिरस मतदारसंघात उपलब्ध झालेले आहेत.
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातील अवर सचिव गणेश कचरे यांनी स्वर्गीय सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर रविराज खूपसे, शशिकांत कचरे, दीपक जानकर आदी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Great article! The depth of analysis is impressive. For those wanting more information, visit: LEARN MORE. Looking forward to the community’s thoughts!
Excellent insights! Your breakdown of the topic is clear and concise. For further exploration, I recommend visiting: READ MORE. Keen to hear everyone’s opinions!
Ищите в гугле