चांदापुरी येथील मल्हार साखर कारखान्यावर स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

चांदापुरी (बारामती झटका)
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील विकासाचा कायापालट करणारा व ग्रामीण भागातील स्थानिक तरुणांच्या गतीला चालना देणारा मल्हार साखर कारखाना लिमिटेड हिमालय नगर, चांदापुरी, ता. माळशिरस येथे भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
मल्हार साखर कारखाना कार्यस्थळावर स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.


यावेळी कारखान्याचे चेअरमन श्री. काशिनाथ देवकाते पाटील यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सिव्हिल इंजिनियर स्वागत मगर, विजयराज माने देशमुख, प्रगतशील बागायतदार श्री. अंकुश पांढरे, श्री. आयाज पठाण, श्री. दादासाहेब पांढरे, श्री. दत्तात्रेय वाघमोडे, यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. तसेच कारखान्याचे सर्व अधिकारी ठेकेदार यांच्यासह सुरक्षा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


मल्हार साखर कारखान्याचे चेअरमन श्री. काशिनाथ देवकाते पाटील यांनी स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांना अभिवादन करून मल्हार साखर कारखाना परिसराचा निश्चितपणे कायापालट करून भविष्यात या भागाचा विकास व शेतकऱ्यांना सहकार्य करण्याच्या दृष्टीने मल्हार साखर कारखान्याची वाटचाल असल्याचे सांगितले. कारखान्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



