मेडद ग्रामपंचायतीमध्ये शोभा लवटे पाटील आणि बायडाबाई झंजे यांच्यात लक्षवेधी लढत
थेट जनतेतील माजी सरपंच युवराज झंजे यांच्या धर्मपत्नी तर पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब लवटे पाटील यांच्या सुनबाई तर सरपंच नाथाआबा लवटे पाटील यांच्या भावजय यांच्यात समोरासमोर लढत
मेडद ( बारामती झटका )
मेडद ता. माळशिरस या गावातील थेट जनतेतील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. वार्ड क्र. ३ मध्ये शोभा लवटे पाटील आणि बायडाबाई झंजे यांच्यात लक्षवेधी लढत लागलेली आहे.
माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब लवटे पाटील यांच्या सुनबाई व मेडद गावचे विद्यमान सरपंच नाथाआबा लवटे पाटील यांच्या भावजय शोभा पोपट लवटे पाटील आणि गेल्या वेळच्या निवडणुकीतील थेट जनतेतील सरपंच युवराज झंजे यांच्या धर्मपत्नी बायडाबाई युवराज झंजे यांच्यात समोरासमोर लढत लागलेली आहे.
गतवेळच्या निवडणुकीत लवटे पाटील काका पुतणे आणि युवराज झंजे एकाच पॅनल मध्ये होते. विरोधी पॅनलमध्ये जगताप व तुपे गट होता मात्र, या निवडणुकीत लवटे पाटील, तुपे आणि जगताप गट एकत्र आलेला आहे. लवटे पाटील आणि झंजे यांच्यात समोरासमोर लढत लागलेली असल्याने अस्तित्व व प्रतिष्ठेची निवडणूक लवटे पाटील व झंजे यांच्यात सुरू आहे. दोन्हीही गटाकडून प्रचाराची जोरदार यंत्रणा सुरू आहे. मतदार कुणाला विजयी करणार, याकडे मेडद गावासह माळशिरस तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
What a compelling and insightful read! The author did a fantastic job. I’m curious to know how others feel about this topic. Click on my nickname for more engaging discussions.