Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

मेडद ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाच्या निर्णायक मतामुळे संदीप जाधव यांचा उपसरपंच निवडणुकीत विजय

माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब लवटे पाटील गट २५ वर्षानंतर ग्रामपंचायतीच्या गुलालापासून वंचित राहिला.

मेडद ( बारामती झटका )

मेडद ता. माळशिरस या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या थेट जनतेतील सरपंच यांना सदस्यांसमवेत एक मत व समसमान झाल्यानंतर अध्याशी अधिकारी एक मत असल्यामुळे थेट जनतेतील सरपंच प्रियांका जितेंद्र लवटे यांच्या निर्णायक मतामुळे संदीप तुकाराम जाधव यांना उपसरपंच पदाच्या निवडणुकीत विजय मिळाला आहे. माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब लवटे पाटील गटाचे संख्याबळ असताना सुद्धा २५ वर्षानंतर ग्रामपंचायतीच्या गुलालापासून वंचित राहिलेला आहे.

मेडद ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या निवडणुकीत पहिल्यांदाच बाळासाहेब लवटे पाटील गट, जगताप गट व तुपे गट एकत्र येऊन निवडणूक लढलेले होते‌. त्यांच्यासमोर गोपाळराव देव प्रशालेचे माजी प्राचार्य धर्मराज लवटे सर व माजी सरपंच युवराजतात्या झंजे यांनी आव्हान उभे केलेले होते. निवडणुकीत लवटे व झंजे गटाचे थेट जनतेतील सरपंच सौ. प्रियांका जितेंद्र लवटे व श्री. बाजीराव प्रभू झंजे, सौ. मंगल शशिकांत लवटे, सौ. पुनम गणेश नवगन, सौ. काशीबाई सुरेश नामदास, श्री. संदीप तुकाराम जाधव, सौ. बायडाबाई युवराज झंजे असे सहा ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेले होते तर, लवटे जगताप तुपे गटाचे सौ. उषादेवी शामराव लवटे, श्री. हनुमंत गणपत जगताप, सौ. अनिता समाधान पवार, श्री. अनिलकुमार कोंडीबा सावंत, सौ. संगीता सचिन लवटे, श्री. महादेव भगवान काळे, श्री. रणजीत तानाजी सोनटक्के असे सात सदस्य निवडून आलेले होते.

सोमवार दि. ०९/०१/२०२३ रोजी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात तालुका कृषी अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौ. पुनम चव्हाण मॅडम यांच्या उपस्थितीत सरपंच सौ. प्रियांका जितेंद्र लवटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केलेली होती. उपसरपंच पदासाठी लवटे जगताप तुपे गटाकडून सौ. उषादेवी शामराव लवटे तर लवटे व झंजे गटाकडून श्री. संदीप तुकाराम जाधव यांनी अर्ज भरलेले होते. सौ. उषादेवी लवटे व श्री. संदीप जाधव यांना सात-सात अशी समसमान मते पडलेली होती. थेट जनतेतील सरपंच यांना राज्य शासनाच्या निर्णयामुळे निर्णायक मत देण्याचा अधिकार असल्याने सौ. प्रियांका लवटे यांनी श्री. संदीप जाधव यांना मत दिलेले असल्याने लवटे जगताप तुपे गटाचे संख्याबळ असताना सुद्धा लवटे व झंजे गटाचा नाट्यमयरीत्या उपसरपंच झालेला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सौ.‌ पुनम चव्हाण यांनी उपसरपंच संदीप चव्हाण विजयी झाल्याची घोषणा केली. यामध्ये ग्रामविकास अधिकारी तथा सचिव रामदास चव्हाण यांनी सहकार्य सहकार्य केले. माळशिरस पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.

निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उपसरपंच पदाची घोषणा करताच उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतीषबाजी व गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. वाजत गाजत ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ मंदिरामध्ये आशीर्वाद घेण्याकरता गेलेली होते.

माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब लवटे पाटील यांनी मेडद ग्रामपंचायत मध्ये गेल्या ३० वर्षांमध्ये अनेक सरपंच व उपसरपंच यांच्या निवडी केलेल्या आहेत, कायम गुलालात होते. मात्र, यंदाच्या थेट जनतेतील सरपंच पदाच्या निवडणुकीत संख्याबळ ग्रामपंचायत सदस्य यांचे असतानासुद्धा राज्य सरकारच्या निर्णयामुळे ३० वर्षानंतर ग्रामपंचायतीच्या गुलालापासून बाळासाहेब लवटे पाटील गट वंचित राहिलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

  1. Hello! Do you know if they make any plugins to help with Search Engine Optimization? I’m trying to get
    my blog to rank for some targeted keywords but I’m not seeing very good success.

    If you know of any please share. Many thanks! I saw similar blog here: Eco blankets

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button