अशी फुलवा घरच्या घरीच परसबाग : कृषीकन्यांचा सल्ला

विझोरी (बारामती झटका)
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज येथील अंतिम वर्षातील कृषीकन्यांद्वारे आयोजित करण्यात आलेल्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत घरच्या घरी सेंद्रीय पद्धतीने आणि अगदी कमी खर्चात किचन गार्डनची संकल्पना रत्नाई कृषी महाविद्यालयातील कृषीकन्यांनी मांडली.
अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटिल, रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जी. नलावडे, प्रा. एस. एम. एकतेपुरे (कार्यक्रम समन्वयक), प्रा. एच. एस. खराडे (कार्यक्रम समन्वयक), प्रा. एम. एस. भोसले (सहाय्यक प्राध्यापक) यांच्या मार्गदर्शनानुसार कृषीकन्या वैभवी ढेंबर, प्रिती फडतरे, अमृता बांदल, ऋतुपर्णा सावंत, वैष्णवी शिंदे, शिवानी पावले, प्रणोती कोरे, तेजश्री शिंदे यांनी विझोरी या गावात शेतक-यांच्या घरी किचन गार्डनिंग करून त्यांना मार्गदर्शन केले.

रासायनिक किटकनाशक आणि तणनाशकांचा वापर भाजीपाल्यामध्ये वाढला आहे. किटकनाशकांचा अति वापर करण्यामुळे आरोग्यावर तसेच मानसिकतेवर परिणाम होत आहे. किमान आपल्या कुटुंबासाठी, आरोग्यासाठी काही प्रयत्न व्हावेत. यासाठी ही संकल्पना असून दहा बाय दहा फुटांच्या जागेत या गार्डन मधून १० ते १२ प्रकारच्या भाज्या मिळू शकतात

उत्तम आरोग्यासाठी सेंद्रिय पद्धतीने आपल्या कुटुंबासाठी भाजीपाला घरच्या घरी पिकवणे, हा उद्देश या संकल्पनेमागे आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



