मोरोची येथे श्री मोरजाई देवी यात्रेनिमित्त भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन
मोरोची (बारामती झटका)
मोरोची ता. माळशिरस येथे श्री मोरजाई देवी यात्रा उत्सवानिमित्त भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन गुरुवार दि. २०/४/२०२३ रोजी दुपारी ४ वा. समस्त ग्रामस्थ मोरोची यांच्यावतीने करण्यात आले आहे.
या कुस्ती मैदानामध्ये इनाम रु. २ लाख रुपयांसाठी उपमहाराष्ट्र केसरी पै. प्रकाश बनकर विरुद्ध महाराष्ट्र केसरी पै. बालारफिक शेख यांच्यात लढत होणार आहे. महाराष्ट्र चॅम्पियन पै. सतपाल सोनटक्के, मेडद विरुद्ध पै. सुरज मुलाणी, खुडूस यांच्यामध्ये लढत होणार आहे. तसेच पै. आशिष वावरे विरुद्ध पै. अक्षय चोपडे यांच्यात लढत होणार आहे. या कुस्ती मैदानाचे निवेदन धनंजय मदने हे करणार आहेत.

तरी जास्तीत जास्त वस्ताद, मल्लसम्राट, कुस्ती शौकीन, भाविक भक्त यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त ग्रामस्थ, मोरोची यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng