मोहिते पाटील भाजपच्या कमळात आले तरीसुद्धा अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे रुतले.
राष्ट्रीय सहकार विकास निगमने ( एनसीडीसी ) मंजूर केलेल्या कारखान्यावर कर्जासाठी मालमत्तेवर ताबा सह्याचे अधिकार द्या अशा अनेक सरकारच्या अटी आहेत.
श्री. शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर साठी 113. 42 कोटी रुपये मंजूर झाले होते. सरकारच्या अटीने अडचणी वाढल्या आहेत.
माळशिरस (बारामती झटका )
राष्ट्रीय सहकार विकास निगमने (एनसीडीसी) मंजूर केलेले कर्ज हवे असेल तर कारखान्याच्या संचालकांनी वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारीचे हमीपत्र द्यावे कारखान्याच्या जागेच्या सात वाऱ्यावर कर्जाचा बोजा चढवावा आणि गहाणखत व अन्य दस्तऐवजावर सह्यांचे अधिकार सरकारला देण्याच्या नव्या अटी घालत सरकारने राज्यातील आर्थिक अडचणीतील सहा साखर कारखान्यांना राज्य सरकारच्या हमीदर राष्ट्रीय सहकार विकास निगमने 549 . 54 कोटी रुपयांच्या खेळत्या भांडवलावर मर्जीन मनी कर्ज मंजूर केले होते. मध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपचे विधान परिषदेचे आमदार व कारखान्याचे विद्यमान चेअरमन रणजीत सिंह मोहिते पाटील यांच्या श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या कारखान्याच्या साठी 113 .42 कोटी रुपये मंजूर झालेले होते. सरकारच्या अटीने अडचणी वाढलेल्या आहेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री ना. अजितदादा पवार यांच्या जाचक पाठीमुळे श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची कोंडी झालेली आहे मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजितदादा पवार यांच्यावर अक्षेप करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित दादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन अर्थ खाते घेतलेले आहे मोहिते पाटील भाजपच्या कमळात आले तरीसुद्धा अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे रुतले अशी सहकारामध्ये व राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.
सहकार विभागाने 03 ऑगस्ट च्या शासन निर्णयात बदल करीत कारखान्यांना मंजूर कर्ज हवे असेल तर आधी आणखी काही अटीची पूर्तता करण्याचे प्रमाण काढले आहे त्यानुसार कारखान्याच्या मालमत्तेचे विवरणपत्र सादर करावे कर्जाची वसुली झाली नाही तर कारखान्याच्या मालमत्तेच्या विक्रीतून कर्जाची वसुली करण्यात येईल याचा समावेश त्रिपक्षीय करार आणि संचालक तसेच कारखान्याच्या हमीपत्र करावा कारखान्याच्या संचालकांनी वैयक्तिक व सामुदायिक जबाबदारीबाबतचे हमीपत्र आणि तसा संचालक मंडळाचा ठराव करून कारखान्याच्या अचल मालमत्तेचे घाण खत करून तसा कारखान्याच्या जमिनीच्या सातबारावर या कर्जाचा बोजा चढावा अशा सरकारच्या नवीन अटी आहेत या नवीन अटीमध्ये श्री शंकर सहकारी साखर कारखाना इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना नीरा भीमा सहकारी साखर कारखाना किल्लारी औसा येथील शेतकरी सहकारी साखर कारखाना जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील रामेश्वर सहकारी साखर कारखाना मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखाना अशा कारखान्यांना कर्ज मंजूर झालेले होते.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या शुभहस्ते 28 ऑगस्ट रोजी श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे नूतनीकरण व विस्तारीकरण भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न होणार होता मात्र देवेंद्रजी फडवणीस यांचा जपान दौरा असल्याने सदरचा कार्यक्रम रद्द झालेला होता कार्यक्रमाची जंगी तयारी सुरू होती पुढील तारीख मिळणार असे निकटवर्ती व कार्यकर्ते यांच्याकडून बोलले जात होते मात्र अजित दादा पवार यांच्या नवीन अटी व शर्ती मुळे सर्व काही शांत शांत झालेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng