म्हसवड येथे काँग्रेस, युवक काँग्रेस यांच्यावतीने संभाजी भिडे यांच्या विरोधात थाळीनाद आंदोलन.
म्हसवड (बारामती झटका)
म्हसवड ता. माण, येथे काँग्रेस युवक काँग्रेस यांच्या वतीने निषेध रॅली काढण्यात आली. संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व राष्ट्रपिता महात्मा फुले व त्यांच्यासह अनेक महापुरुषांबाबत अपशब्द वापरल्यामुळे काँग्रेस व युवक काँग्रेस यांच्यावतीने त्यांचा निषेध करण्यात आला.
म्हसवड येथे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर विचारमंचाच्यावतीने निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेस व युवक काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी निलेश काटे युवक काँग्रेस सचिव महाराष्ट्र राज्य, प्रा. विश्वंभर बाबर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किसान काँग्रेस, विकास गोंजारी नगरसेवक म्हसवड, विजय बनसोडे माजी उपसभापती, विजय बनसोडे, अनिल लोखंडे अनुसूचित जाती जिल्हा उपाध्यक्ष, दाऊद मुल्ला युवक काँग्रेस नेते, जेष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब आटपआडकर, वसंत शिर्के यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng