यमाईदेवी मंदिराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही व पुरातत्त्व खात्याची अडचण येऊ देणार नाही – केंद्रीय मंत्री ना. जयकिशन रेड्डी
“बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” या म्हणीचा दोन दादांच्या कार्यातून महाळुंगकरांना प्रत्यय आलेला आहे.
महाळुंगचे ग्रामदैवत यमाईदेवी मंदिर परिसर विकासासाठी केंद्रीय पुरातत्व मंत्री नामदार श्री. जयकिशन रेड्डी व अधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न झाली.
दिल्ली (बारामती झटका)
श्रीक्षेत्र महाळुंग येथील यमाई देवी मंदिराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही व पुरातत्त्व खात्याची अडचण येऊ देणार नाही, असे केंद्रीय पुरातत्व मंत्री नामदार जयकिशन रेड्डी यांनी माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी महाळुंगचे ग्रामदैवत यमाईदेवी मंदिराच्या बांधकाम व परिसर विकासासाठी आयोजित केलेल्या शिष्टमंडळासमवेत बैठकीमध्ये बोलताना सांगितले आहे. त्यामुळे “बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले” या म्हणीचा प्रत्यय माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि माढा विधानसभेचे पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आलेले दोन दादांच्या कार्यातून महाळुंगकरांना प्रत्यय आलेला आहे.
महाळुंग ता. माळशिरस, जि. सोलापूर, येथील ग्रामदैवत श्री यमाईदेवीचे पुरातत्त्व मंदिर आहे. सदर मंदिराची गेल्या 40 वर्षापासून पडझड सुरू आहे. पुरातत्त्व विभागाकडे सदरचे मंदिर असल्याने माढा विधानसभेचे पाणीदार खासदार बबनदादा शिंदे यांनी निधी उपलब्ध करूनसुद्धा पुरातत्व खात्याची अडचण असल्याने मंदिराची डागडुजी व परिसर विकास करून सुशोभित करण्याची अडचण होती. महाळुंगकरांची व यमाई देवी भक्तांची मनोमन इच्छा होती. यमाई देवीचे पुरातत्व मंदिर जतन करणे गरजेचे होते. यासाठी आ. बबनदादा शिंदे यांचे प्रयत्न सुरू होते. माढा लोकसभेचे खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचेही केंद्र सरकारकडे सातत्याने प्रयत्न सुरू होते. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. बबनदादा शिंदे श्रीपुर-खंडाळी रस्त्याचा लोकार्पण सोहळा कार्यक्रमाच्या वेळी यमाई देवीचे दर्शन घेऊन उपस्थितांना शब्द दिलेला होता. पावसाळी अधिवेशनात आपला प्रश्न आठच दिवसात मार्गी लावण्याचे यमाई देवीच्या प्रांगणामध्ये शब्द दिलेला होता तो शब्द पूर्ण केलेला आहे.
दिल्ली येथील संसदभवन येथे पुरातत्व विभागाचे केंद्रीय मंत्री नामदार जयकिशन रेड्डी यांच्या समवेत महाळुंग यमाई देवी शिष्ट मंडळाची बैठक आयोजित केलेली होती. सदरच्या शिष्ट मंडळामध्ये महाळुंग श्रीपुर नगर पंचायतीचे नगराध्यक्षपती श्री. अशोकराव चव्हाण, ज्येष्ठ नेते विद्यमान नगरसेवक रावसाहेब सावंत पाटील, महाळुंग विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे कर्तव्यदक्ष चेअरमन राजेंद्र उर्फ बंडू वाळेकर, युवा नेते नगरसेवक विक्रमसिंह लाटे पाटील, प्रसन्न कुलकर्णी, युवा नेते सुजित सावंत पाटील आदी शिष्टमंडळ समवेत पत्रकार अभिराज उबाळे सचिन कसबे, भारत नागणे, रविराज लव्हेकर, श्रीनिवास कदम पाटील उपस्थित होते.
खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी मंदिराची संपूर्ण माहिती सांगून सध्याची परिस्थिती सांगितली. मंदिराची पडझड झालेले फोटो दाखवले. यासाठी काय उपाय योजना कराव्या लागतील ते करून निधीची उपलब्धता करण्याची मागणी केली. मंदिराच्या बांधकाम व परिसर विकासासाठी पुरातत्त्व विभागाची अडचण दूर करण्याचे सांगितले. पुरातत्त्व मंत्री ना. जयकिशन रेड्डी यांनी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व शिष्ट मंडळ यांचे म्हणणे ऐकून घेतले. यमाई देवी मंदिर विकासासाठी आराखडा तयार करा, केंद्राकडून आर्थिक मदत व विभागाची अडचण राहणार नसल्याचे सांगत तातडीने डीजे यांना फोन करून बैठकीचे आयोजन केले.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व शिष्ट मंडळाची अधिकाऱ्यांसमवेत केंद्रीय पुरातत्व खात्याचे डीजे व इतर अधिकारी यांच्या समवेत शास्त्री भवन येथे बैठक संपन्न झाली. सदरच्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होऊन यमाई देवीचा चाळीस वर्षाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागलेला आहे. यामुळे यमाई देवी भक्तांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. महाळुंग पंचक्रोशीमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार बबनदादा शिंदे यांना येणाऱ्या काळात यमाई देवी मातेचा आशीर्वाद व भक्तांचे सहकार्य राहणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Great write-up! Your analysis is spot-on. For those wanting to explore more, this link is helpful: FIND OUT MORE. What are your thoughts?
Поиск в гугле