ह. भ. प. सुग्रीव तुकाराम मिटकल महाराज (गुरुजी) यांचे सुश्राव्य कीर्तन अकलूज येथे होणार

कै. भागवत मिटकल यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त कीर्तन, आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन
अकलूज (बारामती झटका)
कै. भागवत दत्तू मिटकल उर्फ आण्णा यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे आयोजन सोमवार दि. 11/8/2025 रोजी शासकीय विश्रामगृहासमोर, अकलूज, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे. या प्रथम पुण्यस्मरण निमित्त ह. भ. प. सुग्रीव तुकाराम मिटकल महाराज (गुरुजी) यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कीर्तनानंतर आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
कै. भागवत दत्तू मिटकल उर्फ आण्णा यांचे वयाच्या 72 व्या वर्षी बुधवार दि. 21/08/2024 रोजी वृद्धापकाळाने राहत्या घरी दुःखद निधन झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

कै. भागवत मिटकल उर्फ आण्णा यांचे मुळ गाव बाभुळगाव आहे. सध्या वास्तव्यास अकलूज येथे आहेत. ते जुन्या काळातील गव्हर्मेंट काॅन्ट्रक्टर होते. आण्णांचा स्वभाव सुसंस्कृत व स्पष्टवक्तेपणा होता. शुध्द आचार, विचार असून ते धार्मिक वृत्तीचे होते. आण्णांच्या शब्दाला किंमत होती. सरळ मार्गाने व्यवसाय करून त्यांनी आपली प्रगती केलेली होती.
अण्णांच्या दुःखद निधनाने मिटकल परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. परमेश्वर मिटकल परिवार यांना दुःखातून सावरण्याचे बळ देवो आणि आण्णांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली…

तरी नजर चुकीने आपणांस आमंत्रण द्यायचे राहिले असल्यास हेच आमंत्रण समजून प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त मिटकल परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



